esakal | महावितरणसमोर भाजपचा एल्गार; सातारा, वाई, कऱ्हाडात 'महाविकास'ला झटका
sakal

बोलून बातमी शोधा

Satara Latest Marathi News Satara News

वीज महावितरणाच्या निषेधार्थ सातारा, वाई व कऱ्हाड तालुक्यात भाजपने "टाळा ठोको व हल्लाबोल' आंदोलन केले.

महावितरणसमोर भाजपचा एल्गार; सातारा, वाई, कऱ्हाडात 'महाविकास'ला झटका

sakal_logo
By
भद्रेश भाटे I हेमंत पवार

वाई (जि. सातारा) : वीज महावितरणाच्या निषेधार्थ वाई शहर व तालुका भाजपने येथील कार्यालयासमोर "टाळा ठोको व हल्लाबोल' आंदोलन केले. सक्तीने वीजबिले वसूल करणाऱ्या राज्यातील महाविकास आघाडीचा या वेळी निषेध करण्यात आला. 

या वेळी महावितरणचे मुख्य अभियंता यांना वीजबिलाबाबत ग्राहकांना सहकार्य करावे, कोणत्याही प्रकारचा त्रास देण्यात येऊ नये याबाबतचे निवेदन देण्यात आले. या वेळी भाजपच्या सहकार आघाडी सहसंयोजक सी. व्ही. काळे, शहर अध्यक्ष राकेश फुले, तालुकाध्यक्ष रोहिदास पिसाळ, जिल्हा चिटणीस यशवंत लेले, कार्यकारिणी सदस्य काशिनाथ शेलार, देवानंद शेलार, सचिन गांधी, तनुजा इनामदार, शस्मिता जैन, नरेंद्र महाजन, श्रीमती विजयाताई भोसले, अजित वनारसे, विक्रम पाटील, शुभदा नागापूरकर, तेजस जमदाडे, अथर्व पाटील, अजय कामठे, उत्तम जायगुडे, प्रसाद चरेगावकर, गुलाब डोंगरे, अरविंद बोपर्डीकर, नगरसेविका वासंती ढेकाणे, रूपाली वनारसे, संजय डोईफोडे, मानसी पटवर्धन, भारती कुलकर्णी, स्नेहा थिटे, अनिल फुले, आदेश खोलपे, राहुल जमदाडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 

शिवरायांच्या नावावर सेनेसह राजकीय पक्षांनी फक्त अस्तित्व निर्माण केलंय; उदयनराजेंचा जोरदार प्रहार

कऱ्हाड :  वीज ग्राहकांना कनेक्‍शन तोडण्याची नोटीस पाठवून चार कोटी जनतेला अंधारात टाकण्याचे पाप करणाऱ्या महावितरणच्या निषेधार्थ येथील वीज कंपनीच्या कार्यालयाबाहेर भारतीय जनता पक्षाच्या वतीने टाळा ठोको व हल्लाबोल आंदोलन आज करण्यात आले. येथील दत्त चौकातील वीज कंपनीच्या कार्यालयाबाहेर झालेल्या आंदोलनात भाजपचे शहराध्यक्ष एकनाथ बागडी, कऱ्हाड दक्षिणचे अध्यक्ष धनाजी पाटील, उपाध्यक्ष प्रशांत कुलकर्णी, सरचिटणीस राहुल भिसे, प्रमोद शिंदे, युवा मोर्चा महाराष्ट्र उपाध्यक्ष सुदर्शन पाटसकर, कऱ्हाड अध्यक्ष विशाल कुलकर्णी, महिला मोर्चा अध्यक्षा सीमा घार्गे, सरचिटणीस धनश्री रोकडे, उपाध्यक्ष नम्रता कुलकर्णी, कामगार आघाडी अध्यक्ष विश्वनाथ फुटाणे, युवा मोर्चा उपाध्यक्ष अभिषेक कारंडे, ओबीसी आघाडी जिल्हाध्यक्ष सुनील शिंदे, शहराध्यक्ष उल्हास बेंद्रे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी उपस्थितांनी घोषणाबाजी केली. महावितरणने वीज ग्राहकांना दिलेल्या वीज कनेक्‍शन तोडण्याच्या नोटिशीचा निषेध करण्यात आला. संबंधित वीज कनेक्‍शन तोडली, तर यापुढे तीव्र आंदोलन करू असा इशारा शहराध्यक्ष श्री. बागडी यांनी दिला. या वेळी मागण्यांचे निवेदन वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले. 

पुणे-सातारा महामार्गाचे काम लवकरच पूर्ण करणार; नितीन गडकरींचे खासदार पाटलांना आश्वासन

सातारा : थकीत वीजबिले सक्तीने वसूल करण्याच्या शासनाच्या निर्णयाच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षाच्या सातारा तालुका व सातारा शहर शाखेतर्फे कृष्णानगर येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर प्रतीकात्मक टाळे ठोको आंदोलन करण्यात आले. वीजपुरवठा खंडित करण्याचा निर्णय त्वरित मागे घ्या, अन्यथा महावितरण कार्यालयांना खरोखर टाळे ठोकू, असा इशारा भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी दिला. 

राज्यातील 72 लाख वीज जोडण्यांचा पुरवठा खंडित करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. त्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले. या वेळी भाजपचे सातारा शहराध्यक्ष विकास गोसावी, तालुकाध्यक्ष राजेंद्र इंगळे, महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्ष सुवर्णा पाटील, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष सुरभी चव्हाण, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष नीलेश नलावडे, जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बलशेटवार व जिल्हा चिटणीस सुनील जाधव, नगरसेविका आशा पंडित, सुनील काळेकर, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते श्री. पावसकर म्हणाले, ""कोरोना काळात जनतेला वीजबिल माफीचे आश्वासन देणारे सरकार आता सक्तीने वीजबिल वसुली करून जनतेला नाहक त्रास देत आहे. थकीत बिल भरले नाही तर वीजपुरवठा खंडित करण्याचा निर्णय घेणारे हे सरकार किती असंवेदनशील आहे हे यावरून दिसून येते. '' 

साताऱ्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथेक्लिक करा

संपादन : बाळकृष्ण मधाळे

loading image
go to top