
पूजा चव्हाण हिचा सात फेब्रुवारी रोजी पुणे येथे संशयास्पद मृत्यू झाला होता.
सातारा : पूजा चव्हाण हिच्या संशयास्पद मृत्यूला वनमंत्री संजय राठोड जबाबदार असून, त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आज भारतीय जनता पार्टीच्या महिला आघाडीच्या वतीने साताऱ्यातील बॉंबे रेस्टॉरंट परिसरात रास्तारोको करण्यात आला.
या आंदोलनात भाजपा महिला मोर्चाच्या उपाध्यक्षा सुवर्णा पाटील, सुरभी चव्हाण, मनिषा पांडे, मोना निकम, वैष्णवी कदम, निर्मला पाटील, अश्विनी हुबळीकर, उमल गिरमे, हेमा भणगे, अलका भणगे व इतर पदधिकारी तसेच महिला सहभागी झाल्या होत्या. पूजा चव्हाण हिचा सात फेब्रुवारी रोजी पुणे येथे संशयास्पद मृत्यू झाला होता. या मृत्यूप्रकरणात वनमंत्री संजय राठोड यांचा सहभाग असल्याचे पुरावे असतानाही पोलिस त्याकडे दुर्लक्ष करत आहेत.
आनेवाडी-तासवडे टोलनाक्यावर सातारकरांना सूट द्या; खासदार उदयनराजे आक्रमक
पोलिसांची भूमिका संशयास्पद असून, या प्रकरणात मोठ्या प्रमाणात राजकीय दबाव आहे. सत्ताधारी पक्षाचा मंत्री असल्याने राठोड यांना वाचविण्याचा प्रयत्न होत असून, त्यांचा राजीनामा घेण्यात यावा, अशी मागणी भाजपाने केली आहे. मागणीकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याने राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशारा भाजपाने दिला होता. यानुसार हे आंदोलन करण्यात येत असून, जोपर्यंत राठोड यांना अटक होत नाही, त्यांचा राजीनामा घेण्यात येत नाही, तोपर्यंत सुरुच ठेवण्याचा इशारा यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात देण्यात आला आहे.
संपादन : बाळकृष्ण मधाळे