esakal | शाब्बास! Indian Engineering Services परीक्षेत चारुदत्तने उभारली यशाची गुढी; युपीएससीत देशात ठरला अव्वल

बोलून बातमी शोधा

Satara Latest Marathi News

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत कऱ्हाडचा चारुदत्त साळुंखे हा देशात अव्वल ठरला आहे.

शाब्बास! Indian Engineering Services परीक्षेत चारुदत्तने उभारली यशाची गुढी; युपीएससीत देशात ठरला अव्वल

sakal_logo
By
हेमंत पवार

कऱ्हाड (जि. सातारा) : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिसेस परीक्षेत कऱ्हाडचा चारुदत्त साळुंखे हा देशात अव्वल ठरला आहे. जिल्हा परिषद शाळा आणि कऱ्हाडच्या शिवाजी हायस्कूलमध्ये माध्यमिक शिक्षण मराठी माध्यमातून घेवूनही 'हमभी कुछ कम नहीं' हेच चारुदत्त याने यातून सिध्द केले आहे.

पाटण तालुक्यातील चाफळ हे चारुदत्त याचे मूळ गाव. त्याचे आई-वडील दोघेही कऱ्हाडला शिवाजी हायस्कूलमध्ये शिक्षक आहेत. त्यामुळे त्यांचे वास्तव्य कऱ्हाडमध्येच आहे. चारुदत्तचे प्राथमिक शिक्षण कऱ्हाडच्या आदर्श प्राथमिक विद्यामंदिरमधून पूर्ण झाले. त्यानंतर पाचवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण येथील शिवाजी हायस्कूलमधून झाले. चारुदत्तने त्याच्या हुशारीची चुणूक दहावीला ९४.५५ टक्के गुण मिळवून दाखवली होती. त्यानंतर त्याने पुण्यातील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधून मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी विशेष प्राविण्यासह मिळवली. 

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी; Indian Air Force मध्ये तब्बल 1524 जागांसाठी बंपर भरती

पुणे इंजिनियरिंग कॉलेजला असताना कॅम्पसमधून त्याला खासगी नोकरीच्या संधी आल्या होत्या. मात्र, त्याने त्या नाकारुन शासकीय सेवेत काम करण्याची तयार ठेवली. चारुदत्तने अखिल भारतीय स्तरावर झालेल्या गेट 2020 परीक्षेत देशात ४८ वा क्रमांक पटकवला होता. सध्या तो भाभा अटॉमिक रिसर्च सेंटरमध्ये संशोधक म्हणून कार्यरत आहे. आता त्याने इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिसेसमध्ये देशात पहिला क्रमांक पटकावून कऱ्हाडचे नाव देशात उज्वल केले आहे. चारुदत्तच्या या यशामुळे त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. 

मंत्री असावा तर असा! काळोखात तडफडत पडलेल्या रुग्णाला गृहराज्यमंत्र्यांचा आधार

कृष्णा खोऱ्याला जागा देण्यास क्षेत्रमाहुलीचा विरोध; मेडिकल कॉलेजचा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर! 

Weekend Lockdown : हातात विळा घेत खासदारांनी खपली गव्हाची केली कापणी

संपादन : बाळकृष्ण मधाळे