मावळत्या वर्षाला निरोप देत यमाई डोंगरावर स्वच्छता मोहीम

मावळत्या वर्षाला निरोप देत यमाई डोंगरावर स्वच्छता मोहीम
Updated on

औंध (जि. सातारा) : मावळत्या वर्षाला निरोप देताना औंध येथील सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते व ग्रामस्थांनी सोशल मीडियाद्वारे दिलेली हाक अन्‌ उत्स्फूर्तपणे साद देत हातात हात घालून मूळपीठ निवासिनी श्री यमाई डोंगरावरती राबवली गेली स्वच्छता मोहीम. या मोहिमेचे कौतुक ग्रामस्थांसह पर्यटक व भाविकांनी केले. 

व्हॉट्‌सऍप ग्रुपच्या माध्यमातून श्रमदानाची संकल्पना पुढे आली. त्यासाठी गावातील विविध तरुण मंडळांचे कार्यकर्ते आणि ग्रामस्थांना श्रमदान मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. ग्रामस्थांनीदेखील कोरोनाच्या भीषण संकटातून बाहेर पडताना मूळपीठ निवासिनी श्री यमाईदेवीच्या डोंगरावर श्रमदान करण्यासाठी धाव घेतली. मूळपीठ डोंगर ते वस्तुसंग्रहालयपर्यंतच्या पायऱ्यांची तसेच दुतर्फा वाढलेली झाडे-झुडपे काढून स्वच्छता करण्यात आली. त्यासाठी ग्रामस्थांबरोबर चाकरमान्यांनीदेखील आवर्जून वेळ काढून या स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला होता. 

पायथ्यापर्यंतच्या पायऱ्यांची आणि परिसराची स्वच्छता झाली नाही. त्यामुळे उर्वरित स्वच्छतेसाठी रविवारी नवीन वर्षाचे स्वागत स्वच्छता मोहिमेने करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. श्रमदानासाठी बाहेरून आलेल्या सर्वांची जेवणाची व्यवस्थाही यावेळी करण्यात आली होती. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com