esakal | इंधन दरवाढीच्या निषेधार्थ साताऱ्यात कॉंग्रेसची निदर्शने; मोदींविरोधात जोरदार घोषणाबाजी
sakal

बोलून बातमी शोधा

Satara Latest Marathi News

केंद्र सरकारचे सर्व कायदे जनतेविरोधी असून, सर्वसामान्यांचे शोषण मोठ्या प्रमाणात होत आहे.

इंधन दरवाढीच्या निषेधार्थ साताऱ्यात कॉंग्रेसची निदर्शने; मोदींविरोधात जोरदार घोषणाबाजी

sakal_logo
By
उमेश बांबरे

सातारा : इंधन दरवाढीच्या निषेधार्थ आज युवक कॉंग्रेस व जिल्हा कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होत राधिका रस्त्यावरील कदम पेट्रोल पंपावर मोदी सरकारच्या निषेधार्थ निदर्शने केली. इंधनासह गॅसची दरवाढ कमी झालीच पाहिजे, मोदी तेरी तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, अशा घोषणा देण्यात आल्या. 

युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष विराज शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या आंदोलनात जिल्हा कॉंग्रेसचे उपाध्यक्ष बाबासाहेब कदम, ऍड. दत्तात्रेय धनवडे, नरेश देसाई, अतुल पवार, सूरत कीर्तिकर, शरद पवार, ज्ञानेश्‍वर पवार, रजिम कलाल, रिजवान शेख, एकनाथ पिसाळ आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते. 

हे पण वाचा- 391 व्या शिवजयंतीनिमित्त 391 देशी झाडे लावून शिवरायांना मानवंदना द्या; अभिनेते सयाजी शिंदेंचे आवाहन

या वेळी विराज शिंदे म्हणाले, ""केंद्र सरकारचे सर्व कायदे जनतेविरोधी असून, सर्वसामान्यांचे शोषण मोठ्या प्रमाणात होत आहे. इंधनाचे दर वाढल्याने देशांतर्गत संपूर्ण अर्थव्यवस्था उद्‌ध्वस्त झाली आहे. महागाईने सर्वसामान्य माणसांचे कंबरडे मोडले आहे. या सर्व बाबींचा विचार करून पेट्रोल- डिझेलवरील अबकारी दर कमी करावेत. घरगुती गॅसचे दर कमी करून सर्वसामान्यांना दिलासा द्यावा. अन्यथा युवक कॉंग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन केले जाईल.'' 

संपादन : बाळकृष्ण मधाळे