esakal | 391 व्या शिवजयंतीनिमित्त 391 देशी झाडे लावून शिवरायांना मानवंदना द्या; अभिनेते सयाजी शिंदेंचे आवाहन
sakal

बोलून बातमी शोधा

Satara Latest Marathi News

राज्यातील शिवकालीन किल्ल्यांची दुरवस्था झाली आहे. त्याचे अस्तित्व धोक्‍यात येऊ लागले आहे.

391 व्या शिवजयंतीनिमित्त 391 देशी झाडे लावून शिवरायांना मानवंदना द्या; अभिनेते सयाजी शिंदेंचे आवाहन

sakal_logo
By
मुकुंद भट

ओगलेवाडी (जि. सातारा) : गडकिल्ल्यांसह निसर्गाचे जतन व संवर्धन करण्यासाठी प्रत्येकाने एक तरी झाड लावावे, असे आवाहन चित्रपट अभिनेते सयाजी शिंदे यांनी हजारमाची (ता. कऱ्हाड) येथील किल्ले सदाशिवगडावर केले. 

391 व्या शिवजयंतीनिमित्त 391 देशी झाडे लावून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र स्मृतीस लोकांनी मानवंदना द्यावी, यासाठी सयाजी शिंदे यांनी सदाशिवगड मावळा प्रतिष्ठानसाठी दुर्गप्रेमी सौरभ पाटील यांच्याकडे विविध प्रकारची सुमारे 400 वृक्ष दत्तक स्वरूपात प्रदान केले. वृक्षारोपणाचा प्रारंभ श्री. पाटील यांनी सदाशिवगडावर केला. त्याप्रसंगी श्री. शिंदे, जयराम स्वामी वडगाव (खटाव) चे मठाधिपती विठ्ठल स्वामी महाराज, सलीम मुजावर, दीपक अरबुणे, तुषार खराडे, सुरेश जोशी, दिलीप दीक्षित, श्री. भोपळे तसेच सदाशिवगड मावळा प्रतिष्ठान, सदाशिवगड भ्रमण मंडळ, शिवराय ट्रेकिंगचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.

हे पण वाचा- भाजपच्या आमदाराची सभापती रामराजेंसोबत खलबत्ते; राष्ट्रवादीच्या गोटात चर्चांना उधाण

मावळा प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. योगेश कुंभार यांनी प्रास्ताविक केले. श्री. पाटील, श्री. कुंभार यांनी सदाशिवगडाच्या विविध विकास प्रकल्पांची माहिती दिली. श्री. शिंदे म्हणाले, "राज्यातील शिवकालीन किल्ल्यांची दुरवस्था झाली आहे. त्याचे अस्तित्व धोक्‍यात येऊ लागले आहे, त्यांची निगा राखण्यास व जतन करण्यास शासनाने लक्ष देण्याची आवश्‍यकता आहे. त्यासाठी त्यांनी भरीव आर्थिक तरतूद केली पाहिजे. वृक्षलागवड मोहीम ही लोकचळवळ झाली पाहिजे.'' सुरेश जोशी व पत्रकार मुकुंद भट यांनी आपले मनोगत व्यक्त केले. आबासाहेब लोकरे यांनी आभार मानले व सूत्रसंचालन केले. 

साताऱ्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

संपादन : बाळकृष्ण मधाळे

loading image