esakal | बोंबला! इंदोलीतील लग्नासाठी कोरेगाव तालुक्यातून एकजण आला अन् चारजणांना सोबत घेऊन 'पॉझिटीव्ह' झाला

बोलून बातमी शोधा

Satara Latest Marathi News}

इंदोलीमध्ये लग्नासाठी मोजकीच वऱ्हाडी मंडळी जमली होती. त्यात एक बाधीत सापडल्यामुळे आणखी तीनजण बाधीत झाली आहेत.

बोंबला! इंदोलीतील लग्नासाठी कोरेगाव तालुक्यातून एकजण आला अन् चारजणांना सोबत घेऊन 'पॉझिटीव्ह' झाला
sakal_logo
By
हेमंत पवार

कऱ्हाड (जि. सातारा) : इंदोली येथील लग्नासाठी कोरेगाव तालुक्यातून एकजण आला होता. त्याला लग्नादरम्यानच कोरोनासदृश्य त्रास होवू लागला. त्याचदरम्यान त्याची माहिती मिळाल्यावर संबंधिताची इंदोली प्राथमिक आरोग्य केंद्रात चाचणी करण्यात आली. त्यामध्ये तो पॉझिटीव्ह आला. 

त्यामुळे संबंधितांच्या संपर्कातील तब्बल 50 जणांची कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तपासणी करण्यात आली. त्यामध्ये आणखी तिघे कोरोनाबाधित सापडल्याची माहिती कऱ्हाड तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख यांनी दिली. त्यामुळे वऱ्हाडींचा झोप उडाली आहे.

हे पण वाचा- काेराेनाचा अहवाल आल्यानंतर कन्या विद्यालय बंद ठेवण्याचा झाला निर्णय

इंदोलीमध्ये लग्नासाठी मोजकीच वऱ्हाडी मंडळी जमली होती. त्यामध्ये एक बाधीत सापडल्यामुळे आणखी तीन बाधीत झाली. त्यांच्या संपर्कातील आणखी काहीजणांची तपासणी करण्यात येणार आहे. त्यामुळे इंदोलीतील लग्नातील वऱ्हाडी मंडळी सध्या चिंतेत आहेत. दरम्यान, ज्यांना त्रास होत असेल त्यांनी तपासणीसाठी स्वतःहुन पुढे यावे, त्यामुळे इतरांना त्याचा त्रास होणार नाही, असे आवाहन कऱ्हाड तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख यांनी केले आहे.

साताऱ्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

संपादन : बाळकृष्ण मधाळे