
गेल्या चार दशकांपासून कचऱ्याचे 40 फुटांपेक्षा मोठे साचलेले ढीग हटविण्याचे काम कचरा डेपोमध्ये 2017 पासून काम सुरू आहे.
कऱ्हाड (जि. सातारा) : नगरपालिकेचा घनकचरा प्रकल्प जिल्ह्यासह राज्यात आयडॉल प्रकल्प ठरला असतानाच तो प्रकल्प घोटाळ्याच्या चर्चेचा मुख्य केंद्रबिंदू ठरला आहे. उपाध्यक्ष जयवंत पाटील, आरोग्य सभापती विजय वाटेगावकर, "जनशक्ती'चे गट नेते राजेंद्र यादव यांनी कचरा डेपोचे पावणेदोन कोटींचे बिल अदा करताना घोटाळ्याचे आरोप केले आहेत. हे आरोप राजकीय आहेत, की खरच त्या प्रकल्पात आर्थिक घोटाळा आहे, त्याची उच्चस्तरीय चौकशीची गरज आहे. पालिकेच्या मासिक बैठकीत चौकशीसाठी समिती स्थापन्याची मागणी झाली. मात्र, त्याबाबत अद्याप काहीच हालचाल नाही.
गेल्या चार दशकांपासून कचऱ्याचे 40 फुटांपेक्षा मोठे साचलेले ढीग हटविण्याचे काम कचरा डेपोमध्ये 2017 पासून काम सुरू आहे. त्या कामासाठी तब्बल सहा कोटींचा डीपीआर झाला. त्यातील पावणेदोन कोटींची निधी मिळाला. कचऱ्याचे बायोमायनिंगचे काम सुरू झाले. मात्र, त्याचे बिल देण्यावरून आरोपांच्या फैरी झडत आहेत. त्यासाठी पालिका अधिकाऱ्यांनी त्या बायमायनिंगच्या कामाचा एक अहवाल केला आहे. त्यात 90 लाखांची रक्कम शिल्लक असल्याचा उल्लेख आहे. त्याच अहवालाचा हवाला देत आरोप होत आहेत. पालिकेच्या मासिक सभेत राजेंद्र यादव, श्री. वाटेगावकर यांनी घोटाळ्याचे आरोप केले. सभेनंतर उपाध्यक्ष पाटील यांनी कचरा डेपोच्या संपूर्ण डीपीआरच्या चौकशीही मागणी केली. घोटाळ्याच्या चौकशीच्या मागण्या, मासिक सभेतील आरोपांमुळे अन्य पालिकांसह देशात नावजलेला कचरा डेपो आर्थिक घोटाळ्याचा केंद्रबिदू ठरला आहे. हे आरोप राजकीय आहेत, की खरंच त्यात घोटाळा आहे, याची चौकशीची गरज आहे. पालिकेने केलेल्या अहवालाचे बिंगही महत्त्वाचे आहे. बिल तयार करताना विलंब का झाला, विलंबित ठेवलेली बिले एकाच दिवशी का अदा करण्यात आली, याच्याही चौकशीची गरज आहे.
एका सिगारेटने केले कोटीचे नुकसान; साताऱ्यात पाच शिवशाही जळून खाक
रक्कम अशी दिली...
घनकचरा प्रकल्पाचे एक कोटी 34 लाख 68 हजार 812 रुपयांचे बिल अदा केले गेले. पहिले बिल 22 लाख 67 हजार 490 रुपयांचे बिल 22 डिसेंबर 2018 रोजी तयार झाले. ते 30 ऑगस्ट 2019 रोजी दिले. त्यानंतरच्या काळात 56 लाख 24 हजार 541 रुपयांचे बिल अदा केले गेले. 13 जुलै 2020 रोजी 45 लाख 17 हजार 706 रुपयांचे बिल तयार केले. ते डिसेंबरपर्यंत ठेवण्यात आले. 15 डिसेंबर 2020 रोजी 10 लाख 59 हजार 102 रुपयांचे दुसरे बिल तयार करून दोन्ही दिली गेली. 23 व 24 डिसेंबरला 45 लाखांसह 10 लाखांचे वाढीव बिल दिले गेले.
साताऱ्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
संपादन : बाळकृष्ण मधाळे