esakal | निगेटिव्ह असणा-या महिलेस दाखविले पॉझिटिव्ह; पुढाऱ्यांच्या दबावामुळे घडला प्रकार
sakal

बोलून बातमी शोधा

COVID19

पुढाऱ्यांच्या दबावाने महिला ठरली काेराेनाग्रस्त; चाैकशीचे आदेश

sakal_logo
By
- प्रशांत गुजर

सायगाव (जि. सातारा) : जावळी तालुक्‍याचे (jawali) प्रवेशद्वार असलेल्या आनेवाडीमध्ये (anewadi) कोरोनाने (coronavirus) तोंड वर काढले असून रोज रुग्ण वाढत असताना येथे काहींच्या अतिउत्साहीपणामुळे निगेटिव्ह असणारा पेशंट पॉझिटिव्ह (covid19 positive) दाखवत रायगावच्या कोरोना सेंटरला (raigoan corona care center) दाखल केल्याने तालुक्‍यात एकच खळबळ उडाली आहे. (satara-news-covid19-report-neagtive-women-political-influence-report-showed-positive-anewadi)

याबाबत माहिती अशी की, आनेवाडीमध्ये गेले अनेक दिवस कोरोना रुग्ण वाढल्याने लोकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. अशावेळी आरोग्य विभागानेदेखील मोठ्या प्रमाणात यंत्रणा राबवून रोजच्या रोज येथील आशा स्वयंसेविकाच्यामार्फत सर्व्हे सुरू केले असून योग्य ती खबरदारी देखील घेतली जात आहे. असे असताना मात्र गावातील काही स्थानिक नेत्यांमुळे आरोग्य विभागाकडून प्रामाणिकपणे काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना वेठीस धरले जात आहे. असाच प्रकार नुकताच घडला. येथील काही पुढाऱ्यांच्या दबावामुळे आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी साेमवारी रात्री दहा वाजता रुग्णाच्या घरी जावून कोरोना टेस्ट केली. या रुग्णाची टेस्ट निगेटिव्ह आली तरीही रात्रीच्या वेळी रुग्णवाहिका बोलावून सायगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणीला जायचे असल्याचे सांगून त्या रुग्ण महिलेला रायगाव येथील कोरोना सेंटरला दाखल करण्यात आले. संबंधित ग्रामसेवकाने आशा स्वयंसेविकेस "तुमची कामे नीट करा' असेही सुनावले. संबंधित महिलेला मंगळवारी दुपारी घरी सोडण्यात आले.

हेही वाचा: माणच्या पंचायत समितीत रासपची बाजी; सभापतिपदी लतिका वीरकरांची निवड

वास्तविक गावच्या प्रमुखांना माहिती न देता शिपायानेदेखील अधिकारी वर्गाला फोन करून प्रशासकीय अधिकाऱ्यांना रात्री-अपरात्री फोन करून त्रास दिला तरीदेखील संबंधित अधिकारी कोणतीही शहानिशा न करता त्यांचे म्हणणे ऐकतातच कसे, असा प्रश्न पडला आहे. वाढणारे कोरोना रुग्ण कमी कसे होतील, हे न पाहता प्रशासनास व आरोग्य विभागाच्या कर्मचारी वर्गास वेठीस धरणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी जनतेतून होत आहे.

काही सुखद बातम्या वाचा

या सर्व प्रकरणाची माहिती घेऊन आरोग्य विभाग व प्रशासनाशी तसेच रुग्णाच्या जिवाशी खेळ करणाऱ्या अपप्रवृत्तींवर योग्य करवाई करण्यात येईल.

- सतीश बुद्धे, गटविकास अधिकारी, जावळी

हेही वाचा: रुग्णांच्या नातेवाईकांना असा मिळेल पास; पाेलिसांची माहिती