esakal | बाधितांच्या संपर्कातील 73 जण निघाले पॉझिटिव्ह; क-हाडात घरोघरी चाचणीस प्रारंभ
sakal

बोलून बातमी शोधा

corona Test

घरोघरी चाचणीस प्रारंभ; 73 जण निघाले पॉझिटिव्ह

sakal_logo
By
सचिन शिंदे/सिद्धार्थ लाटकर

कऱ्हाड (जि. सातारा) : शहरातील बाधितांच्या सहवासातील नागरिकांच्या घरी जाऊन क-हाड पालिकेने (karad muncipal council) केलेल्या कोरोना चाचणीत (covid19 test) 73 जण पॉझिटिव्ह सापडल्याने पालिकेची आरोग्य यंत्रणा हडबडली आहे. तीन दिवसांत कोरोना बाधितांच्या (covid19 patient) अती सहवासातील कुटुंबीयांसह जवळच्या नागरिकांच्या पालिकेने कोरोना चाचणी केल्या. त्यातून धोकादायक रिझल्ट मिळाल्याने पालिकेच्या आरोग्य यंत्रणेत खळबळ उडाली आहे. (satara-news-covid19-testing-home-to-home-karad)

कोरोनाबाधिताच्या संपर्कातील हाय रिस्क (covid19 high risk patient) नागरिकांच्या घरी जाऊन पालिकेच्या पथकाने शनिवारपासून कोरोना टेस्ट करण्यास सुरुवात केली होती. त्यानंरच्या तीन दिवसांत बाधितांच्या नातेवाइकांसह त्यांच्या संपर्कातील 73 लोक कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत. काही ठिकाणी विरोध होऊनही पालिकेने सक्तीने टेस्ट केल्या.

हेही वाचा: 'कृष्णा'च्या निवडणुकीसाठी इच्छुकांना उद्या भरता येणार नाही अर्ज; जाणून घ्या कारण

पालिकेच्या 21 मे रोजी केलेल्या टेस्टमध्ये 17, 22 मे रोजी 25, 23 मे रोजी सात, तर कालच्या 24 मे रोजीच्या टेस्टमध्ये 24 जण पॉझिटिव्ह आढळले. त्यामुळे पालिकेचा आरोग्य विभागही खडबडून जागा झाला आहे. शहरात बाधित व त्याच्या संपर्कात येणारे सुपर स्प्रेडर ठरत असल्याचा निष्कर्ष नागरी आरोग्य केंद्राने व्यक्त केल्याने बाधितांच्या संपर्कातील लोकांच्या टेस्ट करण्याचा निर्णय पालिकेने घेतला.

शहरात बाधितांच्या अती सहवासात आलेल्यांनी कोरोना टेस्ट कराव्यात, असे आवाहन पालिकेने केले आहे. मात्र, त्याला न कोणीच जुमानत नसल्याने बाधितांच्या कुटुंबीयांसह त्याच्या अती सहवासातील लोकांच्या कोरोना टेस्ट घरी जाऊन करण्याचा निर्णय प्रत्यक्षात अंमलबजावणीत आणला आहे.

रमाकांत डाके, मुख्याधिकारी

हेही वाचा: अब्रूची बेअब्रु होईल, भीतीने व्यापाऱ्याने मुलीस 15 लाख दिले

काही सुखद बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा