esakal | महाबळेश्‍वरात मुख्याध्यापकाकडून अल्पवयीन विद्यार्थीनीवर अत्याचार; राष्ट्रवादीकडून नराधमाला शिक्षेची मागणी
sakal

बोलून बातमी शोधा

Satara Latest Marathi News

जागतिक महिला दिन साजरा करत असताना महाबळेश्‍वरातील एका हायस्कूलच्या मुख्याध्यापकाने विद्यार्थीनीवर अत्याचार केले आहेत.

महाबळेश्‍वरात मुख्याध्यापकाकडून अल्पवयीन विद्यार्थीनीवर अत्याचार; राष्ट्रवादीकडून नराधमाला शिक्षेची मागणी

sakal_logo
By
उमेश बांबरे

सातारा : जागतिक महिला दिन साजरा होत असताना महाबळेश्‍वरातील एका शाळेतील मुख्याध्यापकाने अल्पवयीन विद्यार्थीनीवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या घटनेचा राष्ट्रवादीच्या महिलांनी निषेध करत संबंधित नराधमाला कडक शिक्षा करावी, अशी मागणी निवेदनाव्दारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. 

राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्ष समिंद्रा जाधव यांच्या नेतृत्वाखालील महिलांनी निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. यावेळी सदर मुख्याध्यापकांचा निषेध नोंदविण्यात आला. निवेदनात महिलांनी म्हटले की, जागतिक महिला दिन साजरा करत असताना महाबळेश्‍वरातील एका हायस्कुलच्या मुख्याध्यापकाने विद्यार्थीनीवर अत्याचार केले आहेत. 

विदयार्थीनीला विश्वासात घेऊन महाबळेश्वर पाेलिसांनी शाेधला बलात्कारी

संबंधित मुख्याध्यापकाला तातडीने अटक करून त्याला कडक शिक्षा करावी, अशी मागणी केली आहे. या निवेदनावर जिल्हाध्यक्षा समिंद्रा जाधव यांच्यासह नलिनी जाधव, कुसुमताई भोसले, युवती सेलची जिल्हाध्यक्षा पुजा काळे, स्मिता देशमुख, अनघा कारखानिस, उषा पाटील, प्राची ताकतोडे, उषा पाटील, रशिदा शेख, जयश्री साळुंखे उपस्थित होत्या. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

loading image