esakal | विदयार्थीनीला विश्वासात घेऊन महाबळेश्वर पाेलिसांनी शाेधला बलात्कारी

बोलून बातमी शोधा

विदयार्थीनीला विश्वासात घेऊन महाबळेश्वर पाेलिसांनी शाेधला बलात्कारी}

या हेल्पलाईन वरून आलेल्या तक्रारीची गंभीर दखल राज्य पोलिसांनी घेतली. त्यांनी हे प्रकरण चौकशीसाठी महाबळेश्वर पोलिस ठाण्याकडे वर्ग केले. गेली पाच दिवसांपासुन महाबळेश्वर पोलिस या प्रकरणाचा तपास करित होते.

विदयार्थीनीला विश्वासात घेऊन महाबळेश्वर पाेलिसांनी शाेधला बलात्कारी
sakal_logo
By
अभिजीत खूरासणे

महाबळेश्वर (जि. सातारा) : महिलादिनीच एका नराधमाने इयत्ता दहावीतील विदयार्थीनीवर बलात्कार केल्याचे प्रकरण येथे उघडकीस आले आहे. विशेष म्हणजे हा नराधम एका शाळेचा प्राचार्य असून त्याच्या महाबळेश्वर पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. 

साेमवारी (ता.8) देशासह परदेशात महिलादिन मोठया उत्साहात साजरा झाला. महाबळेश्वर शहरात देखील महिला दिनाचे विविध कार्यक्रम झाले. एका शाळेच्या प्राचार्याने केलेल्या कुकर्माने जिल्हा हादरला आहे. संबंधिताने इयत्ता दहावीत शिकत असलेल्या 15 वर्षीय मुलीवर शाळेच्या प्रयोगशाळेत व हॉलमध्ये वारंवार जबरदस्तीने शारिरिक संबंध प्रस्थापीत करून अत्याचार केला. याबाबत एका जागरूक नागरीकाने चाईल्ड हेल्पलाईन 1098 या क्रमांकावर तक्रार दाखल केली होती. 

या हेल्पलाईन वरून आलेल्या तक्रारीची गंभीर दखल राज्य पोलिसांनी घेतली. त्यांनी हे प्रकरण चौकशीसाठी महाबळेश्वर पोलिस ठाण्याकडे वर्ग केले. गेली पाच दिवसांपासुन महाबळेश्वर पोलिस या प्रकरणाचा तपास करित होते. आरोपी व पिडीत विदयार्थीनीचा पत्ता महाबळेश्वर पोलिसांनी शोधुन काढला. पिडीत मुलीला महाबळेश्वर पोलिसांनी विश्वासात घेतल्या नंतर मुलीने आपल्यावर होत असलेल्या आत्याचाराचा पाढा वाचला. मुलीने दिलेल्या फिर्यादी वरून महाबळेश्वर पोलिसांनी नराधम प्राचार्याच्या मुसक्या आवळल्या. महाबळेश्वर पोलिसांनी संबंधितास अटक केली. त्याचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाबळेश्वर पोलिस निरिक्षक बी. ए. कोंडुभैरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक ए. बिद्री या बलात्कार प्रकरणाचा तपास करीत आहेत.

Mahashivratri 2021 : वासोटा मार्गे नागेश्वरला निघालात? थांबा! त्यापुर्वी हे वाचा

100 कोटींच्या निधीतून महाबळेश्वरचा विकास होऊन पर्यटनाला अधिकची चालना मिळेल

पसरणी घाटात पाथर्डीचे (अहमदनगर) तीन पर्यटक जखमी 

Maharashtra Budget 2021 : सातारा सैनिक स्कूलला येणार ऊर्जितावस्था; तीनशे कोटींची तरतूद

व्यापारी गौतम हिरण यांच्या हत्ये प्रकरणी दोघे ताब्यात

Edited By : Siddharth Latkar