
आज सर्वत्र शिवजयंतींचा उत्साह पहायला मिळत असताना, छावाच्या माध्यमातून गडकिल्ल्यांच्या संवर्धनाची माहिती जागेसमोर आणण्याचे काम डॉक्टरांकडून होत आहे.
वडूज (जि. सातारा) : येथील छावा ट्रेकर्सच्या माध्यमातून एकत्र आलेल्या डॉक्टरांनी रोहिडेश्वर व रायरेश्वर या दोन किल्ल्यांवर यशस्वी गिर्यारोहण केले. या मोहिमेत डॉ. सुहास घोरपडे, डॉ. महेश माने, डॉ. संतोष जाधव, डॉ. सौरभ जोशी, डॉ. प्रताप जगदाळे, डॉ. ज्ञानेश घाडगे, सचिन बनसोडे, डॉ. धनंजय काटकर, डॉ. शिवप्रसाद पोरे, डॉ. गणेश गोडसे, डॉ. विजय काटकर सहभागी झाले होते.
शहर परिसरातील वैद्यकीय व्यावसायिक "छावा'च्या माध्यमातून गेल्या काही वर्षांपासून विविध किल्ल्यांवर गिर्यारोहण मोहीम राबवित आहेत. गिर्यारोहणाबरोबरच किल्ल्यावरील परिसरात स्वच्छता मोहीमही राबविली जाते. छावाच्या माध्यमातून छत्रपती शिवरायांच्या गडकिल्ल्यांची सर्वांना माहिती व्हावी, तसेच त्या गडाचे महत्व समजून घेऊन संवर्धन व्हावे, हा हेतू मनात ठेऊन मोहीम फत्ते केली जात आहे.
हे पण वाचा- पुस्तके ही माणसाला विचार देतात; माणसांच्या जीवनाला दिशा देतात
आज सर्वत्र शिवजयंतींचा उत्साह पहायला मिळत असताना, छावाच्या माध्यमातून गडकिल्ल्यांच्या संवर्धनाची माहिती जागेसमोर आणण्याचे काम डॉक्टरांकडून होत असल्याने त्यांचे यानिमित्ताने कौतुक होत आहे. शिवरायांच्या गडकिल्ल्यांची महती जगासमोर यावी, या दृष्टीने डॉक्टरांनी घेतला पुढाकार निश्चित कौतुकास्पद तर आहेच, शिवाय अभिमानास देखील पात्र आहे.
संपादन : बाळकृष्ण मधाळे