ढासळलेली अर्थव्यवस्था गतिमान करण्यासाठी वाईत 30 दिवसांत तब्बल 200 महिला बचत गट स्थापन

Satara Latest Marathi News
Satara Latest Marathi News

भुईंज (जि. सातारा) : वाई तालुक्‍यातील महिला स्वयंसहाय्यता समूहाद्वारे नवीन आर्थिक उंचावण्यासाठी व ग्रामीणस्तरावर महिलांच्या माध्यामातून कौटुंबिक उन्नती साधण्यासाठी केवळ 30 दिवसांत 200 महिला बचत गट स्थापन केले आहेत. 

उमेद व महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत वाई तालुक्‍यात वर्धा जिल्ह्यातील वरधिनींनी सलग 30 दिवसांत तालुक्‍यातील प्रत्येक गावात वाडीवस्तीवर जाऊन महिलांचे समुपदेशन करून 200 स्वयंसहायता महिला बचत गट स्थापन केले. याबद्दल येथे ग्रामपंचायतीने आयोजित केलेल्या परिसंवादात अभियानाचे वाई तालुका समन्वयक रंजुकुमार वायंदडे यांनी या बचत गटांच्या माध्यमातून मरगळलेली आर्थिक व्यवस्था गतिमान करण्याचा प्रयत्न यशस्वी झाल्याचे नमूद केले. अध्यक्षस्थानी सरपंच पुष्पा भोसले, उपसरंपच प्रशांत जाधवराव, ग्रामपंचायत सदस्य, निमंत्रित महिला बचत गटाच्या प्रतिनिधी उपस्थित होत्या. 

सातारा जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक व उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे यांच्या प्रयत्नातून संपूर्ण सातारा जिल्ह्यात बचत गटांची चळवळ अतिशय चांगल्यारीतीने सुरू असून, यात वाई तालुक्‍याने उठावदार कामगिरी केल्याचे वेळोवेळी सिद्ध झालेले आहे. गटविकास अधिकारी उदय कुसुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली विस्तार अधिकारी पूनम गायकवाड, सर्व सहकाऱ्यांनी प्रामाणिकपणे ही चळवळ गतिमान केली. त्यामुळे पूर्वीचे एक हजार बचत गट व नव्याने झालेले 200 बचत गट यांना शासकीय योजना राबवण्याचे मार्गदर्शन करत महिलांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या. त्यामुळे महिला स्वयंसहायता समूहाद्वारे नवीन आर्थिक व्यवस्था यशस्वी झाली आहे, असेही श्री. वायदंडे यांनी सांगितले. प्रारंभी वर्धा जिल्ह्यातून आलेल्या वरधिनींचे सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. अभय ओझर्डे यांनी सूत्रसंचालन केले. उपसरपंच प्रशांत जाधवराव यांनी आभार मानले. 

"बचतगटातीलल महिलांना स्वयंरोजगार व शासकीय योजना मिळण्यासाठी बॅंक सखी मोठ्या प्रमाणावर काम करत आहेत, महिलांनी त्याचा लाभ घ्यावा.'' 

-शैला पिसाळ, सदस्य, भुईंज ग्रामपंचायत

संपादन : बाळकृष्ण मधाळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com