गुगल पे केअर सेंटरमधून फोन.., साताऱ्यात महिलेची फसवणूक

गिरीश चव्हाण
Friday, 30 October 2020

विलासपूर येथे वैशाली कांबळे या राहण्यास आहेत. त्यांना काल एक फोन आला. फोन करणाऱ्याने स्वत:चे नाव अरविंद कुमार असे सांगत गुगल पे कस्टमर केअर सेंटरमधून बोलत असून, एक रिचार्ज झाला आहे. त्यासाठी एनी डेस्क नावाचे ऍप्लिकेशन डाउनलोड करण्यास कांबळे यांना सांगितले. त्यानुसार कांबळे यांनी तांत्रिक कार्यवाही पूर्ण केली.

सातारा : गुगल पे कस्टमर केअर सेंटरमधून बोलत असल्याचे सांगत एकाने साताऱ्याजवळील विलासपूरमध्ये राहणाऱ्या एका महिलेच्या खात्यावरील 99 हजार रुपये काल लांबवले. याची तक्रार वैशाली सुधीर कांबळे यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात नोंदवली आहे. 

विलासपूर येथे वैशाली कांबळे या राहण्यास आहेत. त्यांना काल एक फोन आला. फोन करणाऱ्याने स्वत:चे नाव अरविंद कुमार असे सांगत गुगल पे कस्टमर केअर सेंटरमधून बोलत असून, एक रिचार्ज झाला आहे. त्यासाठी एनी डेस्क नावाचे ऍप्लिकेशन डाउनलोड करण्यास कांबळे यांना सांगितले. 

आंतरजातीय विवाह करुन युवतीवर अत्याचार, साताऱ्यात चौघांवर गुन्हा

त्यानुसार कांबळे यांनी तांत्रिक कार्यवाही पूर्ण केली. हे केल्यानंतर काही वेळातच कांबळे यांच्या बॅंक खात्यातून सुमारे 98 हजार 500 रुपये वर्ग झाले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच, याची तक्रार कांबळे यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात नोंदवली. याचा तपास पोलिस निरीक्षक आण्णासाहेब मांजरे करीत आहेत. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara News Fraud Of A Woman In Satara