esakal | महाबळेश्वर तालुक्‍यात निवडणुकांचा डंका; स्थानिक गटा-तटातच रंगतदार लढती
sakal

बोलून बातमी शोधा

Satara Latest Marathi News Satara Politics News

राजपुरी-दांडेघर विभागावर राजेंद्रशेठ राजपुरे यांचे निर्विवाद वर्चस्व आहे. नेत्यांच्याच राजपुरी गावात काही जागा बिनविरोध निवडून आल्या तर काही जागांवर भाजपचे तालुकाध्यक्ष मधुकर बिरामणे यांनी राजपुरे गटाला आव्हान दिले आहे.

महाबळेश्वर तालुक्‍यात निवडणुकांचा डंका; स्थानिक गटा-तटातच रंगतदार लढती

sakal_logo
By
रविकांत बेलोशे

भिलार (जि. सातारा) : महाबळेश्वर तालुक्‍यात ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे रणकंदन चालू असताना तालुक्‍याचे युवा नेते व जिल्हा बॅंकेचे संचालक राजेंद्रशेठ राजपुरे यांनी बिनविरोधची हाक विभागातील गावकारभाऱ्यांना दिली. मात्र, संपूर्ण ग्रामपंचायती बिनविरोध होऊ शकल्या नाहीत. सध्या भावकी, गट-तट यामध्ये निवडणुका अडकून पडल्या आहेत. त्यामुळे पक्षीय पातळीपेक्षा या निवडणुका अपक्ष पद्धतीने पार पडतात. मात्र, त्याला राजकीय वजनदार नेत्यांच्या मार्गदर्शनाची झालर लागलेली पाहायला मिळते.
 
राजपुरी-दांडेघर विभागावर राजेंद्रशेठ राजपुरे यांचे निर्विवाद वर्चस्व आहे. नेत्यांच्याच राजपुरी गावात काही जागा बिनविरोध निवडून आल्या तर काही जागांवर भाजपचे तालुकाध्यक्ष मधुकर बिरामणे यांनी राजपुरे गटाला आव्हान दिले आहे. आंब्रळ ग्रामपंचायतीतही बिरामणे यांच्या कार्यकर्त्यांनी आपले नशीब आजमावल्याने प्रस्थापितांना खिंडीत पकडले आहे. खिंगर या राजकीयदृष्ट्या संवेदनशील गावात राजकीय दबदबा निर्माण केलेल्या विठ्ठल दुधाने यांच्या उमेदवारीने सर्व कुरघोड्या शांत झाल्या. परंतु; या ठिकाणी दोन जागांवर निवडणूक लागलीच.

आधी बायकोला प्रेमानं शेवटचं Hug, मग दिलं लोकलमधून ढकलून

गोडवली या आमदार दत्तक गावात गावातील राजकीय प्रस्थापितांनी निवडणूक बिनविरोध करण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. इच्छुकांची संख्या जास्त असूनही येथील स्थानिक नेत्यांनी गावपातळीवर एकमत करत विष्णू मालुसरे या अनुभवी व्यक्तीला सत्तेची सूत्रे दिली. परंतु; या ठिकाणीही तीन जागांसाठी निवडणूक लागली आहे. दांडेघरमध्ये राजेंद्रशेठ यांची किमया चालली नाही. त्या ठिकाणीही काही जागांवर निवडणूक लागली आहे. त्यामुळे राजेंद्रशेठ यांनी प्रयत्न करूनही विभागातील एकही ग्रामपंचायत बिनविरोध करण्यात यश आले नाही. 

क्रीडा संकूलाचे कुलूप ताेडले; सातारा पाेलिसांची घुसखाेरी?

निवडणुकीमुळे वातावरण तप्त 
गावपातळीवर टोकाचे राजकारण चालत असल्याने गावातील प्रस्थापित नेते, भावकीचे मार्गदर्शक यावर भवितव्य अवलंबून असते. परंतु, या सर्व ग्रामपंचायती राजेंद्रशेठ यांच्या विचाराच्याच आहेत, असेही म्हणता येईल. त्यामुळे टोकाचे मतभेद असणारे काही मोजके लोक त्यामध्ये गंगेत घोडं न्हाऊन घेत आहेत. एकूणच ग्रामपंचायत निवडणुकीमुळे वातावरण तप्त झाले आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

loading image
go to top