esakal | दक्षिण मांड नदीवरील 50 वर्षांपूर्वीचा पूल इतिहास जमा; नवीन पुलासाठी सरकारचा प्रयत्न
sakal

बोलून बातमी शोधा

Satara Latest Marathi News Satara News

ओंड-उंडाळे दोन्ही गावांना जोडणारा दक्षिण मांड नदीवर असलेला 1970 साली बांधलेला जुना पूल पाडून त्या ठिकाणी नवा पूल बांधण्यात येणार आहे.

दक्षिण मांड नदीवरील 50 वर्षांपूर्वीचा पूल इतिहास जमा; नवीन पुलासाठी सरकारचा प्रयत्न

sakal_logo
By
जगन्नाथ माळी

उंडाळे (जि. सातारा) : पाचवड फाटा ते कोकरुड या मार्गाचे रुंदीकरण होत असल्याने दक्षिण मांड नदीवरील सुमारे 50 वर्षांपूर्वीचा ऐतिहासिक उंडाळे-ओंड गावादरम्यानचा पूल पाडण्यात आला. या पार्श्वभूमीवर या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली असून त्या ठिकाणी नवीन पूल बांधला जाणार आहे.
 
सुमारे दीड वर्षांपासून पाचवड फाटा ते कोकरुड मार्गाचे रुंदीकरण सुरू आहे. पश्‍चिम महाराष्ट्र आणि कोकण या दोन प्रमुख विभागांना जोडणारा हा सर्वांत जवळचा मार्ग आहे. या रस्त्यावरून रत्नागिरी, मालवण तसेच गणेशोत्सव काळात कोकणात वाहतूक होते. रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम गतीने सुरू असून मार्गावरील जुने पूल पाडून नवीन बांधण्यात येत आहेत. 

ग्रामस्थांनो! बर्ड फ्लूची भीती बाळगू नका, काळजी घ्या; जावळीच्या पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनी दिल्या मार्गदर्शक सूचना

त्यामुळे ओंड-उंडाळे दोन्ही गावांना जोडणारा दक्षिण मांड नदीवर असलेला 1970 साली बांधलेला जुना पूल पाडून त्या ठिकाणी नवा पूल बांधण्यात येणार आहे. या रस्त्यावरील वाहतूक तुळसण फाटा, सवादे, शेवाळवाडी, उंडाळे मार्गे वळवण्यात आली आहे. नवीन पुलाचे काम दोन ते तीन महिन्यांत पूर्ण होईल, असा अंदाज आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

loading image