
-सुरेश भोईटे
आरडगाव : जिल्ह्यात साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झाला आहे. त्यासाठी सायंकाळच्यावेळी ऊस वाहतूक करणारी वाहने नियमबाह्य पद्धतीने चालवली जात आहेत. अनेक वाहनांना रिफ्लेक्टर नसल्याने रस्ते अपघाताच्या घटना घडत आहेत. बेकायदेशीर ऊस वाहतुकीला आळा बसावा, यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाने लक्ष घालावे, अशी मागणी होऊ लागली आहे.