अपघात टाळण्यासाठी वाहतुकीचे नियम पाळा; जिल्हाधिकाऱ्यांचे नागरिकांना आवाहन

प्रशांत घाडगे
Friday, 22 January 2021

वाहतुकीचे नियम पाळणे ही प्रत्येकाची जबाबदारी असून, ते प्रत्येकाने पाळले पाहिजेत, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले.

सातारा : वाहतुकीचे नियम पाळणे आपल्याबरोबर दुसऱ्याच्या सुरक्षिततेसाठी खूप महत्त्वाचे असून, अपघाताचे प्रमाण टाळण्यासाठी प्रत्येकाने वाहतुकीचे नियम पाळले पाहिजेत, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले. 

जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयात 32 व्या रस्ता सुरक्षा अभियानास सुरवात झाली. या वेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्सल, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांच्यासह उपप्रादेशिक परिवहन विभागातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

सरकारी कर्मचाऱ्यांनाे! BSNLने तुमच्यासाठी आणलीय खास याेजना  

सिंह म्हणाले, "वाहतुकीचे नियम पाळणे ही प्रत्येकाची जबाबदारी असून, ते प्रत्येकाने पाळले पाहिजेत. वेगाने वाहने चालविण्याचे प्रमाण तरुणांमध्ये जास्त आहे. वेग तुमच्यासाठी व इतरांसाठी धोक्‍याचा असून, नियमांचे पालन करूनच वाहन चालविले पाहिजे. अवजड वाहन चालविणाऱ्यांच्या आरोग्य तपासणीमध्ये डोळ्यांचीही तपासणी करावी. चष्मा लागला असेल अशांना चष्मे वाटप करावेत, यासाठी उपप्रादेशिक परिवहन विभागाने पुढाकार घ्यावा.'' 

Breaking News : उदयनराजेंसह 11 कार्यकर्ते निर्दाेष; वाई न्यायालयाच निर्वाळा

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara News Launch Of Road Safety Campaign At Satara