सरकारी कर्मचाऱ्यांनाे! 'BSNL'ने तुमच्यासाठी आणलीय खास याेजना

सरकारी कर्मचाऱ्यांनाे! 'BSNL'ने तुमच्यासाठी आणलीय खास याेजना

सातारा : भारत संचार निगम लिमिटेडने (BSNL) देशातील शासकीय कर्मचा-यांनी आपल्या सेवेचा अधिकाधिक लाभ घ्यावा यासाठी पुन्हा एकदा प्रयत्न सुरु केले आहेत. बीएसएनएल शासकीय कर्मचा-यांसाठी एक नवीन याेजना घेऊन येत आहे, ज्या माध्यमातून कंपनीला फायदा हाेईल असा त्यांना विश्वास वाटत आहे. देशातील सर्व शासकीय कर्मचा-यांसाठी (निवडक सेवांवर) लँडलाईन, ब्रॉडबँड इंटरनेट आणि फायबर टू होम इंटरनेटवर दहा टक्के सवलत देण्याचा महत्वपुर्ण निर्णय घेतला जाणार आहे. 

बीएसएनएलच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार सध्या कंपनी व्यावसायाच्या स्पर्धेतून अडचणीत आली आहे. ग्राहकांना साेयी सुविधा वेळच्या वेळीस दिल्या जात असल्या तरी त्यांना आकर्षक याेजना मिळत नव्हत्या. त्यामुळे ते खासगी कंपन्यांकडे वळत हाेते. परंतु आता पुन्हा बीएसएनएलने आपले ग्राहक टिकविण्यासाठी तसेच वाढविण्यासाठी विविध याेजना बाजारात आणल्या असून आगामी काळात विशिष्ट समूहाला जाेडण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे.

त्याचाच एक भाग म्हणून फेब्रुवारी महिन्यात देशातील सर्व शासकीय कर्मचा-यांना इंटरनेटच्या वापरासाठी दहा टक्के सवलतीची याेजना आणली जाणार आहे. यामध्ये लँडलाईन, ब्रॉडबँड आणि फायबर टू होम इंटरनेट योजनांच्या रिचार्ज किंमतीवर अतिरिक्त 10 टक्के सूट मिळण्यास पात्र राहतील असेही सांगितले जात आहे. सध्या त्यावर विचारविनिमय सुरु आहे. या नवीन हालचालीमुळे कंपनीला केवळ सध्याचे ग्राहक टिकवून ठेवण्यास मदत होणार नाही तर नवीन सरकारी नोकरदार ग्राहकांना कंपनीकडे आकर्षित करण्यास मदत होईल असा विश्वास सूत्रांनी व्यक्त केला.

दरम्यान यापुर्वी शासकीय कर्मचाऱ्यांना पाच टक्के सवलत दिली जात हाेती. मात्र, आता ती वाढवून दहा टक्क्यांपर्यंत करण्यात आल्याने पैशांची बचत हाेणार असल्याने शासकीय कर्मचारी नक्कीच बीएसएनएलला प्राधान्य देतील असा विश्वास जिल्हा परिषदेमधील कर्मचा-यांनी व्यक्त केला.

दूरसंचार विभागाने यापूर्वी देशातील सर्व शासकीय विभाग आणि कार्यालयांना राज्य संचालक बीएसएनएल आणि एमटीएनएलद्वारे ऑफर केलेल्या लँडलाईन, लीज लाइन किंवा ब्रॉडबँड इंटरनेट सेवांचा अनिवार्यपणे लाभ घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. या कारवाईमुळे सर्व सरकारी विभागांवर राज्य कंपन्यांकडून सेवा निवडण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती परंतु इतर खासगी प्रदात्यांकडून देण्यात सेवा निवडण्यास मनाई केली होती.

शरद पवारांच्या सातारा दौऱ्याला आमदारांनी खो घातला? पालकमंत्र्याची चुप्पी

बंटी किती चॅप्टर आहे ते दादांना विचारा: तीन नेत्यांची खुमासदार टोलेबाजी

पैसे थकीत ठेवणे पडले महागात; कऱ्हाडातील जमिनी हाेणार सरकार जमा

कर्करोग, संसर्गजन्य रोगावर नॅनोकार्गो उपाय; भारतीय संशोधकाचा युरोपियन युनियन कमिशनकडून सन्मान

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com