महाबळेश्वर : ...तरच लॉकडाउनचे नियम शिथिल होतील | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

mahableshwar

महाबळेश्वर : ...तरच लॉकडाउनचे नियम शिथिल होतील

महाबळेश्वर (जि. सातारा) : महाबळेश्वर व पाचगणी (mahableshwar panchgani) ही पर्यटनस्थळे (tourism place) उघडण्यासाठी नागरिकांनी लसीकरणावर (vaccination) भर द्यावा, असे आवाहन पालिकेच्या मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी केले. लसीकरणाच्या सद्य:स्थितीबाबात पाचगणी व महाबळेश्‍वरात लवकरच सर्व्हे करण्यात येईल, असेही त्यांनी नमूद केले. (satara-news-mahableshwar-citizens-coronavirus-vaccination-survey-pallavi-patil-lockdown)

सध्या शहरातील कोरोनाची (covid19) स्थिती प्रशासनाच्या नियंत्रणात आहे. लॉकडाउनचे कडक नियम शिथिल करून ही दोन्ही पर्यटनस्थळे सुरू करण्यास मुख्याधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा, या मागणीसाठी विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी पाटील यांची भेट घेऊन बैठकही घेतली. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी माजी नगराध्यक्ष डी. एम. बावळेकर, विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

पाटील म्हणाल्या, ""शहरातील सर्व नागरिकांनी कोरोना लशीचे दोन डोस घेतले पाहिजेत. शासनाच्या वतीने मोठ्या प्रमाणावर लस उपलब्ध करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी विलंब होण्याची शक्‍यता आहे. अशा वेळी स्वखर्चाने कोरोना लस घेतली पाहिजे. खासगी पध्दतीने कमीत कमी 50 हजार लशींची गरज असते. परंतु, इतक्‍या मोठ्या प्रमाणावर मागणी करता येणार नाही. त्यासाठी पालिकेच्या वतीने शहरातील नागरिकांचा सर्व्हे केला जाईल. किती नागरिकांनी लस घेतली आहे व किती नागरिकांची लस घेणे बाकी आहे, हे या सर्व्हेत स्पष्ट होईल. त्यानंतर लागणाऱ्या लशीसाठी आर्थिक तरतूद करण्यासाठी शहरातील विविध संघटनांनी पुढाकार घ्यावा. काही प्रमाणात पालिकाही नागरिकांच्या लशीसाठी आर्थिक तरतूद करेल. जास्तीत जास्त नागरिकांनी लस घेतल्यानंतरच लॉकडाउनचे नियम शिथिल होतील.''

हॉटेल व्यावसायिक कर्मचारी व त्यांच्या सर्व कुटुंबीयांच्यासाठी लागणारी रक्कम आम्ही देऊ, अशी तयारी हॉटेल व्यावसायिक प्रल्हाद राठी यांनी दाखविली. बैठकीला हॉटेल संघटनेचे अध्यक्ष कैलेश तेजाणी, असिफ सय्यद, दिलीप जव्हेरी, प्रल्हाद राठी, मनीष तेजाणी, माजी नगरसेवक संतोष शिंदे, ज्येष्ठ व्यापारी अतुल सलागरे, रोहन कोमटी, तौफिक पटवेकर, टॅक्‍सी संघटनेचे अध्यक्ष अंकुश बावळेकर, सचिव सी. डी. बावळेकर, घोडा व्यावसायिक संघटनेचे जावेद खारखंडे, व्यापारी संघटनेचे उमेश कोमटी, प्रवीण भांगडिया उपस्थित होते.

या दोन शहरांबरोबरच तालुक्‍यातील नागरिकांचेही लसीकरण लवकरात लवकर करणे आवश्‍यक आहे. त्यासाठी आपण आमदार मकरंद पाटील यांच्याबरोबर चर्चा केली आहे. तेही मदत करणार आहेत.

पल्लवी पाटील, मुख्याधिकारी, महाबळेश्‍वर

ब्लाॅग वाचा

टॅग्स :MahagaonSatara