esakal | व्हॅक्सिनेशन टुरिझम संकल्पनेसाठी महाबळेश्वरसह पाचगणी खूले करा; हॉटेल संघटनांची मागणी
sakal

बोलून बातमी शोधा

d.m.bavlekar

व्हॅक्सिनेशन टुरिझम संकल्पनेसाठी महाबळेश्वरसह पाचगणी खूले करा

sakal_logo
By
अभिजीत खूरासणे

महाबळेश्वर (जि. सातारा) : व्हॅक्सिनेशन टुरिझम (vacciation tourism) या संकल्पनेसाठी महाबळेश्वर पाचगणी (mahableshwar panchgani) येथील हॉटेल उद्याेग (hotels) उघडण्यास परवानगी मिळावी अशी मागणी माजी नगराध्यक्ष डी.एम.बावळेकर (d.m.bavlekar) यांनी केली आहे. यावेळी हॉटेल संघटनेचे अध्यक्ष मनिष तेजाणी यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. बावळेकर म्हणाले, महाबळेश्वर व पाचगणी ही दोन जुळी पर्यटन स्थळे (tourism places) असुन या दोन्ही शहरास भेट देण्यासाठी भारताच्या विविध राज्यातुन साधारण वीस लाख पर्यटक (tourists) येतात. पर्यटनावरच येथील विविध व्यवसायिकांसह सर्वांचे जीवन अवलंबून आहे. परंतु मागील 14 महिन्यात चार महिन्यांचा अपवाद वगळता10 महिने ही दोन्ही पर्यटन स्थळे लॉकडाउनमुळे (lockdown) बंद पडली आहेत. (grant-permission-reopen-hotels-vaccination-tourism-mahableshwar-panchgani-demands-association)

त्यामुळे पर्यटनावर अवंलुबन असलेल्या येथील सर्वच घटकांची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. महाबळेश्वर येथे 30 मोठी स्टार दर्जाची हॉटेल असून लहान हॉटेल व लॉज यांची संख्या दोनशेच्या जवळपास आहे. महाबळेश्वर व पाचगणी येथे 800 टॅक्सी व्यवसायिक व 450 घोडे व्यवसायिक आहेत. त्याच प्रमाणे गाईड कॅन्व्हसर, टपरीधारक, हातगाडीवाले, स्ट्रॉबेरी विक्रेते, पथारीवाले यांचीही संख्या लक्षणिय आहे. या प्रत्येकाची आर्थिक स्थिती हालाखिची झाल्याचे बावळेकर यांनी नमूद केले.

हेही वाचा: आता कसं हाेणार? अनिल अंबानींपुढे निर्माण झालाय पेच

शहरात केवळ दोनच कोरोनाचे रूग्ण असून लवकरच महाबळेश्वर हे कोरोनामुक्त होईल. आम्ही शासनाचे सर्व नियम पाळण्यास तयार आहोत. आपल्या म्हणण्यानुसार आम्ही आमच्या स्वखर्चाने कोरोना लसीचे दोन डोस घेण्यासही तयार आहाेत. पर्यटकांनाही आम्ही व्हॅक्सिनेशन टुरिझम अंतर्गत कोरोना लस उपलब्ध करून देवू. यासाठी आम्हाला आमची हॉटेल उघडण्यास परवानगी दयावी अशी मागणी महाबळेश्वर व पाचगणी येथील तीन हॉटेल संघटनांनी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांचेकडे निवेदनाव्दारे केली आहे अशी माहिती माजी नगराध्यक्ष डी.एम.बावळेकर यांनी दिली.

यावेळी मोठया हॉटेल संघटनेचे अध्यक्ष मनिष तेजाणी, उपाध्यक्ष दिलीप जव्हेरी, लहान हॉटेल संघटनेचे अध्यक्ष असिफ सय्यद, कोषाध्यक्ष रोहन कोमटी व योगेश बावळेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

हेही वाचा: वाईच्या सागरसाठी "शिवराय'चे मावळे ठरले देवदूत

बावळेकर म्हणाले, महाबळेश्वर येथील व्यवसायिकांनी आपल्या व्यवसायासाठी बॅंकामधुन कर्ज काढले आहे. सध्या लॉकडाउन मुळे या कर्जाचे हप्ते फेडणे अवघड झाले आहे. दुसरीकडे दुकानातील माल खराब होवु लागला आहे. जूनमध्ये महाबळेश्वर व पाचगणी ही पर्यटन स्थळे उघडण्यास परवानगी मिळाली तर जूनमधील काही दिवस आमचा व्यवसाय होऊ शकतो व थोडी फार आर्थिक स्थिती पुर्वपदावर येवु शकते. अन्यथा पुढील चार महिने पावसाळयात पुन्हा आमचा व्यवसाय ठप्प होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

या स्थितीत पुन्हा व्यवसाय सुरू करताना मोठया अडचणी येऊ शकतात. हॉटेल असो अथवा व्यवसाय सुरू करताना पुन्हा कर्ज काढावे लागणार. परंतु पुर्वी घेतलेल्या कर्जाचे हप्ते वेळेवर न फेडल्यामुळे आम्हाला बॅंकातुन कर्जही मिळणार नाही या दुष्टचक्रात महाबळेश्वरकर अडकला आहे. त्याला सावरण्यासाठी ही दोन्ही पर्यटन स्थळे आता उघडण्यास परवानगी मिळावी अन्यथा येथील व्यवसायिक उध्वस्त होण्याची भिती माजी नगराध्यक्ष डी.एम.बावळेकर यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.


सध्या सर्वच व्यवसाय ठप्प आहेत. तरी येथील हॉटेल व्यवसायिकांना व लॉजधारकांना वीज व पाण्याची बिले ही वाणिज्य दराने आकारली जात आहेत. ही बिले घरगुती दराने आकारली जावी त्याचप्रमाणे येथील पालिकेने चतुर्थ वार्षिक कर आकारणी करताना करात भरमसाठ वाढ केली होती. ती अन्यायकारक वाढ कमी करावी अशा काही मागण्याही हॉटेल व्यवसायिकांनी आपल्या निवेदनात केल्या आहेत अशी माहिती हॉटेल संघटनेचे अध्यक्ष मनिष तेजाणी यांनी दिली.

grant-permission-reopen-hotels-vaccination-tourism-mahableshwar-panchgani-demands-association

ब्लाॅग वाचा