साताऱ्यात महाविकास आघाडीचा जल्लोष

गिरीश चव्हाण
Friday, 4 December 2020

जयंत पाटील आणि चंद्रकांत पाटील या दोन्ही प्रदेशाध्यक्षांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली होती. अपेक्षेप्रमाणे दोन्ही मतदारसंघ पहिल्यांदाच राष्ट्रवादीने आपल्याकडे खेचून घेतले. या विजयाचा जल्लोष आज राष्ट्रवादी कॉंग्रेसने फटाक्‍यांची आतषबाजी करत पेढे वाटून साजरा केला.

सातारा : पुणे विभाग पदवीधर तसेच शिक्षक मतदारसंघातील विजयानंतर आज साताऱ्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्यासह महाविकास आघाडीतील सहभागी पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी फटाक्‍यांची आतषबाजी करत जल्लोष केला. 

यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, युवा नेते तेजस शिंदे, शिवसेनेचे नरेंद्र पाटील, बाळासाहेब शिंदे व इतर पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. पुणे विभाग पदवीधर मतदारसंघ हा भाजपचा पारंपरिक मतदारसंघ होता. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असित्त्वात आल्यानंतर या मतदार संघासह इतर मतदारसंघावर महविकास आघाडीने लक्ष केंद्रित केले होते. जयंत पाटील आणि चंद्रकांत पाटील या दोन्ही प्रदेशाध्यक्षांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली होती. अपेक्षेप्रमाणे दोन्ही मतदारसंघ पहिल्यांदाच राष्ट्रवादीने आपल्याकडे खेचून घेतले. या विजयाचा जल्लोष आज राष्ट्रवादी कॉंग्रेसने फटाक्‍यांची आतषबाजी करत तसेच पेढे वाटून केला. त्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी तसेच कॉंग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनीही पोवईनाका येथे जल्लोष करत विजयाचा आनंद साजरा करत छत्रपती शिवरायांना अभिवादन केले. 

जेवढा त्रास पवारसाहेबांना द्याल, दुप्पट जनता तुम्हांला देईल; शशिकांत शिंदेंचा भाजपला इशारा

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara News The Mahavikas Aaghadi Celebrated The Victory At Satara