Satara Latest Marathi News
Satara Latest Marathi News

गाव, वाड्या-वस्त्यांत पायाभूत सुविधा देऊ; आमदार महेश शिंदेंची जाखणगावात ग्वाही

Published on

खटाव (जि. सातारा) : प्रशासनातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मदतीने गावाचा विकास साध्य करायचा आहे. त्यासाठी गावचा विकास आराखडा तयार करून गावठाण अंतर्गत बांधकामे व गावठाणामधील वाड्या-वस्त्यांमध्ये पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यास कटिबध्द आहोत, अशी ग्वाही आमदार महेश शिंदे यांनी दिली. 

जाखणगाव (ता. खटाव) या आपल्या मूळ गावातील ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच, सदस्यांच्या सदिच्छा भेटीप्रसंगी आमदार शिंदे यांनी मार्गदर्शन केले. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावातील नागरिकांच्या समग्र विकासाचा हेतू साध्य झाला पाहिजे. गावातील शिक्षण, आरोग्य, नागरिकांच्या मूलभूत सुविधा, जल, जंगल, जमीन व पशुधन यांच्यावर येत्या काळात काम करून उन्नती साधायची आहे. त्यासाठी आमदार फंडातून गावासाठी अनेक कामे मंजूर केली आहेत.

ग्रामपंचायत इमारतीसाठी 45 लाख, गावातील सर्व रस्ते सिमेंटचे, पेव्हर ब्लॉक, बंदिस्त गटारे, पिण्याचा व शेती पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न आहे. सर्व पाणंद रस्ते स्वखर्चातून करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. याप्रसंगी सरपंच नारायण शिंदे, उपसरपंच वंदना खटावकर, ग्रामपंचायत सदस्य नितीन कदम, चंद्रकांत वाघचौडे, सारिका शिंदे, ज्येष्ठ नेते गणपत शिंदे, गजानन शिंदे, जालिंदर वायदंडे, किसन जाधव, बंडू शिंदे, ग्रामसेवक, तलाठी उपस्थित होते. अर्जुन शिंदे यांनी प्रास्ताविक केले. राजेंद्र भगत यांनी आभार मानले. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com