यशवंतरावांमुळे सामान्य माणूस सत्तास्थानी; झेडपीच्या अध्यक्षांची कऱ्हाडात कबुली

Satara Latest Marathi News
Satara Latest Marathi News

कऱ्हाड (जि. सातारा) : सामान्य माणूस ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांनी सत्तेच्या केंद्रस्थानी आणला. जिल्हा परिषदेत आम्हाला त्यांच्यामुळेच काम करण्याची संधी आणि प्रेरणा मिळाली. त्यांचे ऋण महाराष्ट्र कधीही विसरू शकणार नाही, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले यांनी केले. 

ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीचे औचित्य साधून जिल्हा परिषदेच्या विविध विषय समित्यांची सभा आज येथे झाल्या. त्या वेळी ते बोलत होते. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदीप विधाते, शिक्षण सभापती मानसिंगराव जगदाळे, महिला बालकल्याण सभापती सोनाली पोळ, समाजकल्याण सभापती कल्पना खाडे, कृषी व पशुसंवर्धन सभापती मंगेश धुमाळ, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव, सभापती प्रणव ताटे, उपसभापती रमेश देशमुख, गटविकास अधिकारी डॉ. आबासाहेब पवार, सहायक गटविकास अधिकारी उषा साळुंखे, गटशिक्षण अधिकारी शबनम मुजावर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख, तसेच जिल्हा परिषद, पंचायत समितीचे सदस्य उपस्थित होते. 

श्री. कबुले म्हणाले, ""यशवंतराव चव्हाण यांनी पंचायतराज व्यवस्थेचा पाया घातला. त्यामुळे ग्रामीण भागातील सामान्य माणूस सत्तेच्या केंद्रस्थानी आला. आपण जे कोणी आहोत ही त्यांचीच प्रेरणा आहे. यशवंतरावांचे राजकारण व समाजकारणातील आदर्श आपण जपले पाहिजेत.'' मानसिंगराव जगदाळे, सभापती ताटे यांनी मनोगत व्यक्त केले. गटविकास अधिकारी डॉ. पवार, महाबळेश्वरचे गटशिक्षण अधिकारी आनंद पळसे यांनी स्वागत केले. नितीन नलवडे यांनी सूत्रसंचालन केले. शबनम मुजावर यांनी आभार मानले.

चिंताजनक! दापोलीत लग्नाला गेलेल्या 80 जणांपैकी 13 जण बाधित; विहेत आठ दिवस लॉकडाउन

संपादन : बाळकृष्ण मधाळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com