esakal | मार्चमध्ये मिलिटरी कॅंटीन चार दिवस राहणार बंद; कमांडर राजेंद्र शिंदेंची माहिती

बोलून बातमी शोधा

मार्चमध्ये मिलिटरी कॅंटीन चार दिवस राहणार बंद; कमांडर राजेंद्र शिंदेंची माहिती}

मार्चमध्ये एक, दोन व तीन रोजी कॅंटीन स्टॉक टेकिंगसाठी बंद राहणार आहे.

satara
मार्चमध्ये मिलिटरी कॅंटीन चार दिवस राहणार बंद; कमांडर राजेंद्र शिंदेंची माहिती
sakal_logo
By
दिलीपकुमार चिंचकर

सातारा : येथील मिलिटरी कॅंटीन मार्चमध्ये चार दिवस बंद राहणार असल्याची माहिती कॅंटीनचे व्यवस्थापक कमांडर राजेंद्र शिंदे यांनी दिली. दरम्यान, कार्डधारक माजी सैनिकांनी तालुकानिहाय दिलेल्या तारखांना कॅंटीनला यावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. 

मार्चमध्ये एक, दोन व तीन मार्चला कॅंटीन स्टॉक टेकिंगसाठी बंद राहणार आहे. तसेच 29 मार्चला धुलीवंदनानिमित्त बंद राहणार आहे. प्रत्येक मंगळवारी पूर्ण व प्रत्येक सोमवारी कॅंटीन अर्ध्या दिवसासाठी बंद राहील. 

आनेवाडी-तासवडे टोलनाक्‍यावर सातारकरांना सूट द्या; खासदार उदयनराजे आक्रमक

चार व आठ मार्चला सातारा, कऱ्हाड, पाटण, जावळी, वाई आणि महाड. 10 व 15 मार्चला कोरेगाव, खटाव, माण, फलटण, खंडाळा, वेळापूर आणि महाबळेश्‍वर. 17 व 22 मार्चला सातारा, कऱ्हाड, पाटण, जावळी, वाई आणि महाड. 24 व 28 मार्चला कोरेगाव, खटाव, माण, फलटण, खंडाळा, वेळापूर आणि महाबळेश्‍वर आणि 29 मार्चला वरील तारखांना येऊ न शकलेल्या कार्डधारकांनी कॅंटीनला यावे, अशी सूचना देण्यात आली आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे