तारळी धरणाकडे जाणाऱ्या पर्यटकांचा प्रवास होणार सुखकर; गृहराज्यमंत्र्यांच्या पुढाकाराने विकासकामांना गती

Satara Latest Marathi News
Satara Latest Marathi News

तारळे (जि. सातारा) : दीर्घकाळ रस्त्याच्या डागडुजीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या धुमकवाडी-मुरुड रस्त्याच्या कामाला नुकताच मुहूर्त लागला असून, प्रवासी व वाहनधारकांची खड्डेयुक्त रस्त्याच्या प्रवासातून सुटका होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सुमारे 75 लाख रुपये खर्च होणाऱ्या या रस्त्याचे भूमिपूजन नुकतेच झाले. 

यावेळी अभिजित पाटील, बबनराव शिंदे, संजय देशमुख, गजानन जाधव, सोमनाथ खामकर, रणजित शिंदे, नामदेव साळुंखे, माणिकशहा पवार, सोसायटीचे अध्यक्ष दादासाहेब सावंत, माजी अध्यक्ष एकनाथ सावंत, मुरुडचे उपसरपंच नितेश लोरे आदी मान्यवरांसह ग्रामस्थ उपस्थित होते. तारळी धरणाकडे जाणारा हा प्रमुख मार्ग आहे. कोंजवडे-आवर्डे-मुरुड असा जाणारा हा मार्ग खड्ड्यात गेलेला होता.

रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता हे कळणेही मुश्‍कील झालेल्या या रस्त्याची दारुण अवस्था झाली होती. मार्गातील आवर्डे ते धुमकवाडी रस्त्याचे गतवर्षी नूतनीकरण झाले होते. तर काटेवाडी ते आवर्डे रस्त्याचे गेल्या महिन्यात कामाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे केवळ धुमकवाडी ते मुरुड रस्त्याचे काम बाकी राहणार होते. मात्र, मंत्री शंभूराज देसाई यांच्या माध्यमातून हे ही काम मार्गी लागले असून, नूतनीकरणचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे तारळी धरणाकडे जाणारे स्थानिक व पर्यटकांचा प्रवास सुखकर होणार आहे. याचे जनतेतून स्वागत होत आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com