esakal | अवकाळीने नुकसान झालेल्या पिकांचे ताबडतोब पंचनामे करा; आमदार शिंदेंचे प्रशासनाला सक्त आदेश
sakal

बोलून बातमी शोधा

Satara Latest Marathi News

आमदार महेश शिंदे कोरोना पॉझिटिव्ह असून, सध्या ते हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत.

अवकाळीने नुकसान झालेल्या पिकांचे ताबडतोब पंचनामे करा; आमदार शिंदेंचे प्रशासनाला सक्त आदेश

sakal_logo
By
ऋषिकेश पवार

विसापूर (जि. सातारा) : खटाव तालुका उत्तर भागात गुरुवारी (ता. 18) गारपीट आणि वाऱ्यासह अवकाळीने थैमान घातले. या आपत्तीने परिसरातील शेतकऱ्यांचे हातातोंडाशी आलेले पीक जमीनदोस्त झाले असून, लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. 

आमदार महेश शिंदे कोरोना पॉझिटिव्ह असून, सध्या ते हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. त्यांनी महसूल, तसेच कृषी विभागाला नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून सरसकट पंचनामे करण्याच्या सूचना केल्या. त्यांच्या सूचनेनुसार नुकतेच पुसेगाव गटातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी गारपिटीने झालेल्या नुकसानीची पाहणी केली. या वेळी अचानक आलेल्या या अवकाळीने काढणीस आलेली पिके खराब झाल्याने या नुकसानाचे स्वरूप हे नेहमीपेक्षा मोठे असून, शेतकऱ्यांना अश्रू अनावर झाल्याची माहिती सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त रणधीर जाधव यांनी दिली. ज्वारी, गहू, हरभरा आणि कांदा या पिकांचे नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले. 

हे पण वाचा- पाटणात नुकसान भरपाईपासून दहा हजार शेतकरी वंचित; सरकारकडून तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार

या वेळी बुधचे सरपंच अभय राजेघाटगे, मोळचे वैभव आवळे, ललगुणचे सरपंच जयवंत गोसावी, शिवाजी शेडगे, हणमंत शिंदे, सागर मदने, जालिंदर वाघ, कुंडलिक भंडलकर, अजय वाघ आदी कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, पदाधिकाऱ्यांनी मोळमधील नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करून आमदार शिंदे यांना फोनवरून माहिती दिली. मिळालेल्या माहितीवरून अवकाळीने नुकसान झालेल्या बाधित पिकांचे तत्काळ पंचनामे करण्याचे आमदार शिंदे यांनी यांनी महसूल, कृषी विभागास सूचना केल्या. या नुकसानीमुळे शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये. आम्ही शेतकऱ्यांसोबत आहोत, असा विश्‍वासही आमदार शिंदे यांनी या वेळी दिला. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे