esakal | आसाम निवडणुकीसाठी छाननी समितीच्या अध्यक्षपदी पृथ्वीराज चव्हाण
sakal

बोलून बातमी शोधा

Satara Latest Marathi Political News

आसाम राज्याच्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसच्या अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी यांच्या सूचनेनुसार निवड झाली आहे.

आसाम निवडणुकीसाठी छाननी समितीच्या अध्यक्षपदी पृथ्वीराज चव्हाण

sakal_logo
By
उमेश बांबरे

कऱ्हाड (जि. सातारा) : माजी मुख्यमंत्री, आमदार पृथ्वीराज चव्हाण यांची आसाम राज्याच्या विधानसभा निवडणुकीसाठी छाननी समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. 

आसाम राज्याच्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसच्या अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी यांच्या सूचनेनुसार निवड झाली आहे. कॉंग्रेसने छाननी समिती स्थापन केली आहे. त्याच्या अध्यक्षपदी आमदार चव्हाण यांची निवड झाली आहे.

खुशखबर! आमदारांना वाढीव एक कोटीची लॉटरी; साताऱ्यातील दहा जणांना मिळणार बंपर 30 कोटी

त्यांच्यासोबत कमलेश्वर पटेल, श्रीमती दीपिका पांडे सिंग, जितेंद्र सिंग, रिपून बोरा, देब्रता साइकिया, अनिरुद्ध सिंग, पृथ्वीराज साठे, विकास उपाध्याय आदींची सदस्य म्हणून नियुक्ती झाली आहे. दोन दिवसांत समितीची पहिली बैठक आमदार चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केली आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

loading image