'राष्ट्रवादी'च्या कार्यकर्त्यांवरील गुन्हे त्वरित मागे घ्या; आमदार शिंदेंची पोलिस अधीक्षकांकडे मागणी

Satara Latest Marathi News
Satara Latest Marathi News
Updated on

सातारा : इतर ठिकाणच्या परवानग्या मिळवल्यानंतर फ्लेक्‍स उभारणीसाठी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, पदाधिकारी पोलिसांकडे परवानगी मागणी अर्ज करतात. ही परवानगी न देता नंतरच्या काळात पोलिसांकडून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात येतात. गुन्हे दाखल करण्यासाठी हेच कसे सापडतात, असा सवाल करत आमदार शशिकांत शिंदे यांनी गुन्हे मागे घेण्याची मागणी पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांच्याकडे केली. 

साताऱ्यातील एका बैठकीसाठी आलेल्या शिंदे यांची अजयकुमार बन्सल यांच्याशी भेट झाल्यानंतर त्यांनी गुन्हे चुकीच्या पद्धतीने दाखल होत असल्याबाबत नाराजी व्यक्‍त केली. याबाबतच्या तक्रारी राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आमदार शिंदेंकडे केल्या होत्या. विविध कारणास्तव गाव, तसेच शहरातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते फ्लेक्‍स उभारत असतात. 

यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांची परवानगी घेण्यात येते. मात्र, त्यासाठीची परवानगी पोलिस देत नाहीत. फक्‍त राष्ट्रवादीच्याच कार्यकर्त्यांवर असे गुन्हे दाखल होत असून, त्याचा खुलासा होणे आवश्‍यक असल्याची मागणीही शिंदे यांनी बन्सल यांच्याकडे बंद खोलीतील चर्चेत केल्याची माहिती राष्ट्रवादीच्या एका पदाधिकाऱ्याने दिली. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Pune Satara Highway weekend traffic
Greater Flamingo sighting
Koyna Dam reservoir live storage report July 2026
Koyana Dam Water Release
Marathi News Esakal
www.esakal.com