esakal | Maratha Reservation : मराठा आरक्षणप्रश्नी 'निकाल' विरोधात गेला, तर उद्रेक होईल; खासदार उदयनराजेंचा सरकारला गर्भित इशारा
sakal

बोलून बातमी शोधा

Satara Latest Marathi News

मराठा समाजातील आमदार व खासदारांप्रमाणे इतर समाजातील आमदार खासदारांनी मराठा आरक्षणाच्या लढ्याला पाठिंबा दिला पाहिजे, असे मत खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केली.

Maratha Reservation : मराठा आरक्षणप्रश्नी 'निकाल' विरोधात गेला, तर उद्रेक होईल; खासदार उदयनराजेंचा सरकारला गर्भित इशारा

sakal_logo
By
जालिंदर सत्रे

पाटण (जि. सातारा) : अन्य समाजाप्रमाणे मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे. मराठा आरक्षणासंदर्भात न्यायालयात योग्य न्याय मिळाला नाही तर आमदार, खासदारांचे जनतेने राजीनामे घेऊन पदावरून खाली खेचावे. त्यास जबाबदार म्हणून त्यांना घरातून बाहेर पडू देऊ नका, असे खासदार उदयनराजे भोसले यांनी सांगितले. मराठा समाजाचे ज्येष्ठ नेते व राजकारणात वयाने मोठी असणारी मराठा आरक्षणासंदर्भात एकही स्टेटमेंट देत नाहीत. ही विचार करण्याची गोष्ट आहे, अशी टिप्पण्णीही खासदार भोसले यांनी व्यक्त केली. 

येथील तहसील कार्यालयासमोर 10 फेब्रुवारीपासून मराठा आरक्षणासाठीच्या साखळी उपोषण सुरू होते. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता तात्पुरते स्थगित केले आहे. खासदार भोसले यांच्या हस्ते उपोषण सोडण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. सुनील काटकर, विक्रमबाबा पाटणकर, रवी पाटील, पवन तिकुडवे, नितीन सत्रे, शंकरराव मोहिते, यशवंत जगताप आदी उपस्थित होते. 

रामदास आठवलेंच्या Go Corona, Corona Go..ला उदयनराजेंचे खास समर्थन; शरद पवारांच्या भेटीचेही उलगडले सत्य

मराठा समाजातील आमदार व खासदारांप्रमाणे इतर समाजातील आमदार खासदारांनी मराठा आरक्षणाच्या लढ्याला पाठिंबा दिला पाहिजे. कारण त्यांना मराठा समाजही मतदान देत असतो, असे स्पष्ट करून खासदार भोसले म्हणाले, "न्यायालय काय निकाल देतेय हे पाहावे लागेल. न्याय देवतेला माझी कळकळीची विनंती आहे, की मराठ्यांवर अन्याय होऊ नये. मात्र, निकाल विरोधात गेला तर उद्रेक होणारच.

लॉकडाउनच्या पार्श्वभुमीवर जनतेला दिलासा देण्यासाठी उदयनराजेंनी 'महाविकास'ला सूचविली उपाययाेजना 

मराठा आरक्षणासंदर्भातील एका बैठकीत मी प्रश्न विचारायला गेलो तर अशोक चव्हाणांना एवढी घाई होती, की त्यावर आपण पुन्हा बोलू, असे सांगून टाळले. त्यामुळे आम्हाला जी भूमिका मांडायची होती. त्याचे रेकॉर्ड झाले नाही.'' आंदोलनकर्ते पवन तिकुडवे यांना लिंबू पाणी देऊन आंदोलन स्थगित केल्याचे खासदार भोसले यांनी जाहीर केले. तहसीलदार योगोश्वर टोपे यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले. या वेळी लॉकडाऊन करू नये, याबाबत व्यापाऱ्यांनी खासदार भोसले यांना निवेदन दिले. 

सातारा जिल्ह्यात Covid 19 ची लस संपली! दोन लाख नागरिकांचा दुसरा डोस लांबणीवर

रूपाली चाकणकरांनी अध्यक्षपदासाठी सूचविलेल्या नावास राष्ट्रवादीतूनच विरोध; शरद पवार, सुप्रिया सुळेंच्या निर्णयाकडे लक्ष 

Video पाहा : बेड, रेमडिसिव्हर, औषधांचा तुटवडा भासणार नाही; जिल्हाधिकाऱ्यांची ग्वाही

संपादन : बाळकृष्ण मधाळे