esakal | ज्याच्यात हिम्मत असेल, त्याने पुढे यावे; शिवपुतळ्यावरुन उदयनराजेंचे प्रशासनाला थेट आव्हान

बोलून बातमी शोधा

Satara Latest Marathi News}

वेळे येथे चार वर्षांपूर्वी शिवछत्रपतींचा पन्नास फुटी अश्‍वारुढ पुतळा उभारण्यात आला होता.

ज्याच्यात हिम्मत असेल, त्याने पुढे यावे; शिवपुतळ्यावरुन उदयनराजेंचे प्रशासनाला थेट आव्हान
sakal_logo
By
गिरीश चव्हाण

सातारा : वेळे (ता. वाई) येथे महामार्गालगत उभारण्यात आलेल्या शिवछत्रपतींचा पन्नास फुटी पुतळा हटविण्याची नोटीस राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने बजावल्याचे समोर आल्यानंतर आज त्या परिसरात तणाव निर्माण झाला होता. या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर खासदार उदयनराजे भोसले यांनी त्याठिकाणास भेट दिली. ते आल्याचे समजताच त्याठिकाणी असणाऱ्या राष्ट्रीय प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी त्याठिकाणाहून काढता पाय घेतला. 

वेळे येथे चार वर्षांपूर्वी शिवछत्रपतींचा पन्नास फुटी अश्‍वारुढ पुतळा उभारण्यात आला होता. याच पुतळ्याच्या परिसराचे यंदाच्या शिवजयंतीच्या पार्श्‍वभूमीवर सुशोभीकरण करत राजधानी सातारा, असा सेल्फी पॉईंट त्याठिकाणी तयार करण्यात आला होता. या सेल्फी पॉईंटचे लोकार्पण ता. 18 रोजी खासदार उदयनराजे यांच्या हस्ते झाले. सध्या महामार्गाच्या विस्तारीकरणाचे काम सुरु असून त्यासाठीची जमीन संपादन प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. यानंतर रुंदीकरणाच्या कामात अडथळा ठरणारी बांधकामे हटविण्याच्या कामावर महामार्ग प्राधिकरणाने लक्ष केंद्रित केले. यानुसार त्यांनी संबंधित जमीन तसेच मालमत्ता धारकांना अतिक्रमणाबाबत नोटिसा बजावल्या. 

अवैध धंद्यांवर कडक कारवाई करणार; पोलिस अधीक्षक बन्सलांचा इशारा

नोटिसा बजावलेल्यांमध्ये शिवछत्रपती पुतळा ज्याठिकाणी उभारला आहे, त्या जमीन मालकाचा देखील समावेश आहे. आज त्याठिकाणी महामार्ग प्राधिकरणाने रस्ता रुंदीकरणासाठी आवश्‍यक असणाऱ्या जमिनीवरील बांधकामे व इतर अतिक्रमणे हटविण्याचे काम सुरु केले. या कामादरम्यान शिवछत्रपती यांचा पुतळा हटविण्यात येणार असल्याचे समोर आल्याने त्याठिकाणी मोठी गर्दी जमली. जमलेल्या गर्दीने पुतळा हटविण्यास आक्षेप घेत प्रशासनाने मनमानी केल्यास त्याचे तीव्र पडसाद राज्यभरात उमटतील, असा इशारा दिला. या इशाऱ्याच्या पार्श्‍वभूमीवर त्याठिकाणी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला. 

माझ्या तर बुद्धीच्या बाहेर आहे, त्यांनाच विचारा; उदयनराजेंचा टाेला

याची माहिती मिळाल्यानंतर खासदार उदयनराजे हे त्याठिकाणी दाखल झाले. ते आल्याचे समजताच त्याठिकाणच्या महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी काढता पाय घेतला. उदयनराजेंनी त्याठिकाणी जमलेल्यांकडून परिस्थिती जाणून घेतली. यानंतर त्यांनी, ज्याच्यात हिम्मत असेल त्याने पुतळा काढण्यासाठी पुढे येण्याचे आव्हान दिले. त्यांनी घेतलेल्या आक्रमक पवित्र्यामुळे त्याठिकाणच्या तणावात आणखीनच भर पडली होती. या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे.  

साताऱ्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

संपादन : बाळकृष्ण मधाळे