
कऱ्हाड-तासगाव राष्ट्रीय महामार्गालगत कार्वे येथे कृष्णा नदीवरील पुलाजवळ स्मशानभूमी आहे. तेथे रस्त्यालगत विजेचा खांब आहे. तो खांब गतवर्षीच्या महापुरावेळी कोलमडला. त्यानंतर वीज कंपनीने त्यावरील विजेचा प्रवाह बंद केला. मात्र, तो खांब तेव्हापासून तशाच अवस्थेत आहे. त्यावरील विजेच्या तारा लोंबकळत आहेत.
रेठरे बुद्रुक (जि. सातारा) : कार्वे येथील स्मशानभूमीजवळ असलेला विजेचा खांब अपघातास निमंत्रण देत आहे. कऱ्हाड-तासगाव राष्ट्रीय महामार्गालगतच या खांबाचा प्रवाशांनाही व्यत्यय होत आहे. खांब कोलमडला असून, तो बंद स्थितीत असला तरी त्याचा वाहनांना मोठा धोका आहे. याकडे संबंधित वीज वितरण कंपनीने त्वरित लक्ष देण्याची गरज आहे.
कऱ्हाड-तासगाव राष्ट्रीय महामार्गालगत कार्वे येथे कृष्णा नदीवरील पुलाजवळ स्मशानभूमी आहे. तेथे रस्त्यालगत विजेचा खांब आहे. तो खांब गतवर्षीच्या महापुरावेळी कोलमडला. त्यानंतर वीज कंपनीने त्यावरील विजेचा प्रवाह बंद केला. मात्र, तो खांब तेव्हापासून तशाच अवस्थेत आहे. त्यावरील विजेच्या तारा लोंबकळत आहेत. रस्त्यालगत हा खांब असल्याने वाहनांना त्याचा अडथळा होत आहे. खांबालगतच झाड असल्यामुळे त्या खांबाचा अचानक धोका दिसत आहे.
वीज वितरण कंपनीच्या पंचवीस वर्षीय शाखा अभियंत्याची किन्हईत आत्महत्या
त्यामुळे लोंबकळणाऱ्या तारा चुकवताना वाहने विरुद्ध दिशेला वळवावी लागतात. वाहनांच्या या कसरतीत मोठा अपघात होण्याची शक्यता जाणवत आहे. त्याचबरोबर सध्या साखर कारखान्याचे हंगाम सुरू असल्याने रहदारी वाढली आहे. स्मशानभूमीजवळ राष्ट्रीय मार्ग असल्याने हा खांब त्वरित काढून घ्यावा. या धोकादायक क्षेत्रावर वीज कंपनीने कार्यवाही करण्यास विलंब केल्याने प्रवासी व ग्रामस्थ संतप्त आहेत. स्मशानभूमीत कोलमडलेला खांब सर्वांना धोकादायक आहे. तो खांब काढण्याची खूप गरज आहे, असे कार्वेचे माजी सरपंच वैभव थोरात यांनी सांगितले.
संपादन : बाळकृष्ण मधाळे