esakal | म्युकर मायकोसिसने ग्रासले सातारकर; 69 रुग्णांवर उपचार सुरु
sakal

बोलून बातमी शोधा

Mucormycosis

म्युकर मायकोसिसने ग्रासले सातारकर; 69 रुग्णांवर उपचार सुरु

sakal_logo
By
सिद्धार्थ लाटकर

सातारा : सातारा जिल्ह्यात एप्रिल आणि मे महिन्यात कोरोनाचे रुग्ण (covid19 patients) माेठ्या संख्येने वाढले हाेते. जून महिन्यात जिल्ह्यात कोरोना (coronavirus) बाधितांची संख्या दिवसेंदिवस कमी होऊ लागली आहे. या बराेबरच मृत्यची संख्या 40 वरुन 20 च्या आत पाेचली आहे. सातारा जिल्ह्यात (satara) रविवारी जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट हा 9.27 इतका हाेता. त्यामुळे जिल्हावासियांना थोडासा दिलासा मिळाला आहे. कोरोना बाधितांची संख्या जरी कमी होत असली तरी कोरोनातून मुक्त झाल्यानंतर काहींना अन्य आजारांना सामोरे जावे लागत आहे. यामध्ये म्युकर मायकोसिस (mucormycosis) या आजाराचा युवकांनी धसका घेतला आहे. सातारा जिल्ह्यात आजपर्यंत सुमारे 121 नागरिकांना कोरोनाबरोबरच म्युकर मायकोसिसची लागण झाली. त्यातून 19 नागरिक दगावले. आत्तापर्यंत सुमारे 35 रुग्णांनी यावर मात केल्याचे आरोग्य विभागाने सांगितले. हा आजार झालेले 69 रुग्ण रुग्णालयात उपचार घेताहेत. (satara-news-post-covid19-paitents-suffering-mucormycosis)

सातारा जिल्ह्यातील 13 खासगी रुग्णालयात या आजारावर उपचार मिळतात. या आजारावरील उपचाराचा खर्च सामान्यांच्या आवाक्‍या बाहेर जाऊ लागल्याने येथील क्रांतिसिंह जिल्हा नाना पाटील जिल्हा रुग्णालयात रुग्ण दाखल होण्याचे प्रमाण वाढले. यामुळे येथे दोन स्वतंत्र वॉर्ड तयार करण्यात आले. यामध्ये 17 आणि 10 बेडची व्यवस्था आहे. येथील जम्बो कोविड रुग्णालयात (छत्रपती शिवाजी संग्राहलय) येथे म्यूकर मायकोसिससाठी 40 बेडी व्यवस्था करण्यात आली आहे.

हेही वाचा: उदयनराजेंच्‍या आजूबाजूला जादूगार, ते ऐनवेळी कुठेही प्रकट होतात

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली म्यूकर मायकोसिस वॉर्डात तज्ञ वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहे. डॉ. चव्हाण म्हणतात हा काळ्या बुरशीचा आजार आहे. बुरशीचा धोका रुग्णाच्या शरीरात अचनाक कूठे उदभवेल हे सांगता येत नाही. त्यामुळे कोविड 19 रुग्णांवर उपचार करणारे आमचे वैद्यकीय पथक सातत्याने रुग्णांना इतर आजारपासून दूर ठेवण्यासाठी काळजी घेत असतात. म्यूकर मायकोसिसमुळे रुग्णांची दृष्टी जाते असे आपण म्हणू शकत नाही. ज्यांना डोळ्यांचे पुर्वीपासून आजार आहेत. त्यांना या आजारामुळे शारिरिक परिणाम सोसावे लागले आहेत.

हेही वाचा: ग्रामस्थांनाे! 15 ऑगस्ट पर्यंत काेयनेतील तराफा सेवा बंद

 After corona Mucormycosis

After corona Mucormycosis

दरम्यान जिल्ह्यातील 121 रुग्णांपैकी पाच जणांना अंधत्व आले आहे. सायनसमधून पसरली गेलेली बूरशी डोळ्यांच्या नसावर आल्याने त्या काढून टाकाव्या लागल्या आहेत. पाच पैकी चार रुग्णांची एका डोळ्याची नस काढावी लागली आहे. या चार जणांना अंशतः अंधत्व आले आहे. एका रुग्णास मात्र पुर्णतः अंधत्व आल्याचे आरोग्य विभागाने नमूद केले. म्यूकर मायकोसिस झालेल्या काही रुग्णांवर मोठ्या शस्त्रक्रियाही कराव्या लागल्या आहेत.

ब्लाॅग वाचा

loading image
go to top