ग्रामस्थांनाे! 15 ऑगस्ट पर्यंत काेयनेतील तराफा सेवा राहणार बंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Boat

ग्रामस्थांनाे! 15 ऑगस्ट पर्यंत काेयनेतील तराफा सेवा बंद

सातारा : सातारा जिल्हा परिषदेच्यावतीने तापोळा (tapola) या ठिकाणी सुरु असलेली तराफा (बार्ज बोट) सेवा 15 ऑगस्ट पर्यंत बंद राहणार असल्याची माहिती तराफा (बार्ज बोट) व्यवस्थापकांनी दिली आहे. कोयना धरणाच्या (koyna dam) शिवसागर (shivsagar) जलाशयाची पातळी ही कमी झाल्याने तराफा अलीकडे पलीकडे लावण्यास अडचणी येत आहेत. तापोळा, गाढवली, केळघर तर्फ सोळशी या तीन ठिकाणी तराफा सेवा सुरु असते. (satara-tapola-boat-closed-till-15-august-mahableshwar)

सातारा (satara), महाबळेश्‍वर (mahableshwar) तसेच कांदाटी खोरे अशा तिन्ही बाजूला या ठिकाणाहून या तराफ्यातून चार चाकी व दुचाकी अशई छोटी मोठी सर्व वाहने अलीकडे पलीकडे नेता येतात. कांदाटी खो-यातील लोकांना या तराफ्याचा मोठ्या प्रमाणात फायदा होत असतो. सध्या शिवसागर जलाशयाची पाण्याची पातळी कमी होऊ लागली आहे. यामुळे तराफा चालविण्यास अडचण होते असे व्यवस्थापनेचे म्हणणे आहे. तराफा अलीकडे पलीकडे लावण्यास अडचणी येताहेत. परिणामी कोणाची ही अडचण होऊ नये यासाठी 15 ऑगस्टपर्यंत तराफा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान सध्या कांदाटी खो-यात काही ठिकाणी बांधकाची छोटी मोठी कामे सुरु आहेत. या कामांसाठी बांधकाम साहित्याची वाहतुक केली जात होती. परंतु तराफा सेवा बंद राहणार असल्याने बांधकाम साहित्याचे ने-आण करणे थांबणार आहे. ज्या ग्रामस्थांची बांधकामे सुरु आहेत. त्यांनी तूर्तास बांधकाम साहित्य शक्‍यता घेऊ नये कारण तराफ्यातून वाहनांची ने-आणि अलीकडे पलीकडे करता येणार नाही. ग्रामस्थांनी तराफा सेवा सुरु होईपर्यंत सहकार्य करावे असे आवाहन व्यवस्थापनाने केले आहे.

काही सुखद बातम्या वाचा

टॅग्स :Satara