कालगाव, तारगावातील शेतकऱ्यांना न्याय द्या; रेल्वे महाव्यवस्थापकांना साकडे

हेमंत पवार
Saturday, 23 January 2021

कोल्हापूर ते सातारा दरम्यानचा निरीक्षण दौऱ्यासाठी महाव्यवस्थापक मित्तल कोल्हापूर, जयसिंगपूर, मिरज, सांगली आणि सातारा दौऱ्यावर आले होते.

कऱ्हाड (जि. सातारा)  : कालगाव, तारगाव येथील रेल्वे प्रकल्प बाधित शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी शेतकरी संघटनेच्या वतीने मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल व रेल्वेच्या वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे नुकतीच करण्यात आली. 

कोल्हापूर ते सातारा दरम्यानचा निरीक्षण दौऱ्यासाठी महाव्यवस्थापक मित्तल काल कोल्हापूर, जयसिंगपूर, मिरज, सांगली आणि सातारा दौऱ्यावर आले होते. ते तारगाव येथे रेल्वे फाटकाच्या उद्‌घाटनासाठी थांबले होते. त्या वेळी त्यांनी मंडल रेल प्रबंधक रेणू शर्मा स्थानकांवरील प्रवाशांसाठीच्या सुविधा, रेल्वे मार्ग आणि मोठे पूल, डब्यांची देखभाल दुरुस्ती विभाग, नव्याने झालेली कामे याची पाहणी केली. त्यादरम्यान शेतकरी संघटनेचे अनिल घराळ, विनायक जाधव, मेजर रामचंद्र माने, रणजित जाधव यांच्यासह शेतकऱ्यांनी त्यांची कालगाव- तारगाव दरम्यान भेट घेऊन मागणी मांडली. 

निवडणुकीसाठी 100 कोटी खर्च करू, तुम्हाला मंत्रीपद देऊ; भाजपची राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याला ऑफर

त्यामध्ये त्यांनी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी रेल्वेच्या दुपरीकरणाच्या कामात जाणार आहेत, त्यांना भरपाई देण्यात यावी, त्यांचे खरेदीपत्र करून देण्यात यावे, रेल्वेच्या खालून पाइपलाइन घालण्यासाठी परवानगी देण्यात यावी, शेतकऱ्यांना रेल्वे रुळावरून ये-जा करण्यासाठी मोफत परवानगी देण्यात यावी यासह अन्य मागण्या केल्या. या वेळी अधिकाऱ्यांना मागण्यासंदर्भात विचार करण्यात येईल, असे आश्वासन दिले. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara News Railway General Manager Sanjeev Mittal Visit Kolhapur Sangli And Satara