चुकीला माफी नाही, राजेंद्र यादवांची नगराध्यक्षा शिंदेंवर कडाडून टीका

चुकीला माफी नाही, राजेंद्र यादवांची नगराध्यक्षा शिंदेंवर कडाडून टीका
Updated on

कऱ्हाड (जि. सातारा) : यंदाच्या स्वच्छ सर्वेक्षणाचे ठराव एकमताने मंजूर होऊनही नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांनी त्यावर स्वाक्षऱ्या केलेल्या नाहीत. त्या स्वाक्षरी का करत नाहीत, याची माहिती देत नाहीत. जनशक्ती म्हणून स्वच्छ सर्वेक्षणात नेहमीच आम्ही पुढे राहिलो आहोत. आम्ही चुकल्यास आघाडीच्या सर्व नगरसेवकांचे राजीनामे देऊ. स्वाक्षऱ्या नाहीत, त्या नगराध्यक्षा चुकल्या असतील तर त्यांनीही राजीनामा द्यावा, असे आव्हान जनशक्ती आघाडीचे गटनेते राजेंद्र यादव यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिले. 

या वेळी नियोजन सभापती विजय वाटेगावकर, नगरसेवक हणमंत पवार, महिला व बालकल्याण सभापती स्मिता हुलवान, बांधकाम सभापती किरण पाटील, नगरसेवक गजेंद्र कांबळे, ओंकार मुळे, प्रीतम यादव उपस्थित होते. श्री. यादव म्हणाले, "नगराध्यक्षांच्या स्वाक्षरी न करण्यामुळे कऱ्हाड स्वच्छ सर्वेक्षणातून नक्कीच बाहेर पडणार आहे. जनशक्ती आघाडी तसे होऊ देणार नाही. स्वच्छतेसाठी प्रशासनाला सोबत घेऊन आम्ही जिवाचे रान करून देशात सलग तिसऱ्या वर्षी प्रथम क्रमांक टिकवून ठेऊ. यंदा स्वच्छ सर्वेक्षणातून बाहेर पडावे, असे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी नगरसेवकांना पत्र दिले आहे. त्यात नगरसेवकांचा काहीही दोष नाही. 

स्वच्छ सर्वेक्षणाचे ठराव एकमताने मंजूर आहेत. नगराध्यक्षा शिंदे त्यावर स्वाक्षऱ्या करत नाहीत. स्वच्छ सर्वेक्षणात जनशक्तीचे नगरसेवक कुठे कमी पडलेले नाहीत. तसे वाटत असेल जनशक्तीचे सर्व नगरसेवक राजीनामा देतील. चूक नसतानाही खापरही फोडून घेणार नाही. जनशक्तीने विरोधकांना विकासकामांत चार वर्षांत सहकार्य केले आहे.''  

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Kolhapur Board Receives Proposal to Cancel Recognition of Panchgani’s Pinewood School
Maratha Heritage Comes Alive as Satara Museum Adds New Galleries on Shivaji Era
Mahendra Crowned Hind Kesari as Pune’s Prithviraj Finishes Runner-Up
Political Buzz Intensifies in Karad as Krishna Sugar Factory Election Process Begins
Marathi News Esakal
www.esakal.com