esakal | Good News : महाराष्ट्रातील दुसरे विमान प्रशिक्षण केंद्र कऱ्हाडला होणार; माजी मुख्यमंत्र्यांचा पुढाकार
sakal

बोलून बातमी शोधा

Satara Latest Marathi News

कऱ्हाड विमातळाचा पूर्ण वापर व्हावा, यासाठी माझे प्रयत्न सुरू असल्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.

Good News : महाराष्ट्रातील दुसरे विमान प्रशिक्षण केंद्र कऱ्हाडला होणार; माजी मुख्यमंत्र्यांचा पुढाकार

sakal_logo
By
हेमंत पवार

कऱ्हाड (जि. सातारा) : माजी मुख्यमंत्री, आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या पुढाकाराने येथील विमानतळावर विमान प्रशिक्षण केंद्र सुरू होणार आहे. त्यासाठी आमदार चव्हाण व विमान प्रशिक्षण देणाऱ्या ऍकॅडमीच्या अधिकाऱ्यांनी आज विमानतळाची पाहणी केली. आठ विमानांव्दारे एका बॅचमध्ये 60 विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. 

येथील विमानतळावर फ्लाइंग ऍकॅडमी सुरू करण्याठी ते योग्य आहे की नाही, याबाबत यापूर्वी अँबिशिअस फ्लाइंग ऍकॅडमी व एअरस्पीड एव्हिएशन ऍकॅडमीच्या वतीने तपासणी करण्यात आली होती. त्यादरम्यान आमदार चव्हाण यांनी ऍकॅडमीचे मुख्य कार्यकारी अधिकारी परवेज दमानिया, संचालक अश्विन अडसूळ, मनोज प्रधान, विनोद मेनन, विलास वरे यांना सहकार्य केले होते. त्यानुसार आज एक विमान चाचणीसाठी येथे आणण्यात आले. त्यामध्ये हे विमातनळ फ्लाइंग ऍकॅडमीसाठी योग्य असल्याचे स्पष्ट झाले.

हे पण वाचा- थोडं फार होणारच! उदयनराजेंनी गृहराज्यमंत्र्यांच्या भेटीनंतर सोडले मौन

आज माजी मुख्यमंत्री चव्हाण यांच्या उपस्थितीत संबंधित कंपनीचे अधिकाऱ्यांची बैठक झाली. प्रशिक्षणासाठी एकूण आठ विमाने येणार असून, त्याव्दारे एका बॅचमध्ये 60 विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. देशात या पद्धतीची 10 विमान प्रशिक्षण केंद्रे असून, महाराष्ट्रात हे दुसरे केंद्र असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या वेळी कॉंग्रेसचे कऱ्हाड दक्षिणचे अध्यक्ष मनोहर शिंदे, युवक कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष शिवराज मोरे, नानासाहेब पाटील, शहराध्यक्ष राजेंद्र माने, इंद्रजित चव्हाण, नगरसेवक इंद्रजित गुजर, पंचायत समिती सदस्य नामदेव पाटील, रवी बडेकर, शिवाजी जमाले, मोहनराव शिंगाडे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. 

हे ही वाचा- जय शिवराय! सुर्वेंची तिसरी पिढी जपतेय मर्दानी खेळांची परंपरा

आमदार चव्हाण म्हणाले,"" कऱ्हाड विमातळाचा पूर्ण वापर व्हावा, यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत. विमानतळ विस्तारीकरणही प्रलंबित आहे. विमानतळावर उड्डाण ऍकॅडमी सुरू करण्यासाठी काही ऍकॅडमींनी विमानतळ विकास कंपनीकडे प्रस्ताव दिला आहे. मुंबई, पुण्याला हवाई वाहतूक मोठी आहे. त्यामुळे खासगी वाहतुकीला ते परवानगी देत नाही. विमान प्रशिक्षणासाठी कऱ्हाड हे चांगले ठिकाण आहे. त्यामुळे उड्डाण ऍकॅडमींनी कऱ्हाडची मागणी केली आहे. युवक-युवतींना त्यातून प्रशिक्षणाची संधी मिळेल.'' 

साताऱ्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

संपादन : बाळकृष्ण मधाळे