पाटण तालुक्‍यात अमर्याद उत्खननाने कोयनाकाठ धोक्‍यात; महसूलची बघ्याची भूमिका

Satara Latest Marathi News Satara News
Satara Latest Marathi News Satara News
Updated on: 

मोरगिरी (जि. सातारा) : अमर्याद माती उत्खननामुळे कोयना नदीकाठ धोक्‍याचा बनू लागला आहे. त्यामुळे नदीचे पात्र बदलण्याची भीती व्यक्त होत आहे. या माती उत्खननावर नियंत्रणासाठी कारवाई करण्याएवेजी महसूल विभाग बघ्याची भूमिका घेताना दिसते. त्यामुळे ग्रामस्थांत संताप आहे. अनेक भागात पूररेषेत वीटभट्टीसाठी माती उत्खनन सुरू आहे. 

तालुक्‍यात वीटभट्टी व्यवसायासाठी मातीचे उत्खनन होत आहे. शेकडो ब्रास मातीची तालुक्‍याबाहेर वाहतूक होत आहे. मातीच्या उपशामुळे नदीकाठच्या गावांना धोका निर्माण झाला आहे. गौण खनिजाचे नियम तोडून होणारे उत्खनन धोक्‍याचे ठरताना दिसते. वीटभट्टीसाठी मातीचे उत्खनन मोठ्या प्रमाणात होत आहे. त्रिपुडी, चोपडी, नेरळे, सांगवड, शिरळ गावांच्या हद्दीत कोयनाकाठ वीटभट्टीसाठी पोखरला जात आहे. धरणातून सोडण्यात येणारे पाणी हे शेतीसह गावात घुसण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. त्यामुळे पूररेषेत वीटभट्टीसाठी मातीचे उत्खननाची परवानगी न घेताच होणारे उत्खनन पुराचा धोका वाढवते आहे. प्रत्येक वर्षी पुराचे पाणी गावात घुसते. त्याला माती उत्खनन जबाबदार आहे. त्यामुळे उत्खननाच्या कारणांकडे होणारे दुर्लक्ष पूरस्थिती निर्माण करण्यास कारणीभूत ठरत आहे. त्याचा विचारही महसूल विभागाकडून केला जात नाही. कोयना नदीकाठी असणाऱ्या गावांमध्ये राजरोसपणे मातीचे हजारो ब्रास उत्खनन सुरू आहे. त्यामुळे पर्यावरण धोक्‍यात आले असून नदीकाठच्या गावांनाही धोका निर्माण झाला आहे. 

अहवाल घेऊनच परवानगी द्यावी 
नदीकाठच्या पूररेषेतील अनेक भागात होणारे उत्खनन महसूल विभागाकडून दुर्लक्षित केले जाते. माती उत्खननासाठी परवानगी एकीकडे, तर उत्खनन दुसरीकडे सुरू असते. गौणखनिज उत्खनन व वाहतूक परवानगी देतानाच काही अटी घालण्याची गरज आहे. त्यासाठी तलाठी, मंडल अधिकारी यांचा अहवाल महत्त्वाचा आहे. तो घेण्याची गरज आहे. 

साताऱ्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Nhalewadi Leopard Attack Two Year Old Dies in Satara Citizens Demand Action Against Forest Officials Over Safety Lapses in Area
Satara Murder Case Old Dispute Turns Deadly as 29 Year Old Man Dies After Iron Hoe Blow Two Suspects in Custody
Satara Leopard Attack Child Dies in Nhalewadi After Leopard Drags 26 Month Old Boy Away Villagers Demand Action
Sugar Mill Opening
Marathi News Esakal
www.esakal.com