esakal | कऱ्हाड-ढेबेवाडी मार्गावरील विंगमध्ये तब्बल पंधरा वर्षांनंतर धावली 'लालपरी'

बोलून बातमी शोधा

Satara Latest Marathi News}

प्रवासासाठी पर्यायी कऱ्हाड-ढेबेवाडी बसथांब्यावरून प्रवाशासह विद्यार्थ्यांची ये-जा सुरू होती.

कऱ्हाड-ढेबेवाडी मार्गावरील विंगमध्ये तब्बल पंधरा वर्षांनंतर धावली 'लालपरी'
sakal_logo
By
विलास खबाले

विंग (जि. सातारा) : अखेर तब्बल पंधरा वर्षांनंतर लालपरी येथे धावली. ग्रामस्थांच्या सेवेत हजर झाली. बस सुरू करण्याच्या मागणीला विशेषः महिलाच्या पुढाकाराला त्यात यश आले. हिरवा झेंडा दाखवून पहिली फेरी सोडताना तिचे उत्साहात स्वागत करण्यात आले, त्यामुळे ग्रामस्थांत चैतन्याचे वातावरण निर्माण झाले. 

यापूर्वी गावातून दहा ते बारा बसफेऱ्या सुरू होत्या. अनेक अडचणींमुळे कालांतराने त्या बंद पडल्या. त्यामुळे विद्यार्थ्यांसह प्रवाशाची गैरसोय होत होती. प्रवासासाठी पर्यायी कऱ्हाड- ढेबेवाडी बसथांब्यावरून प्रवाशासह विद्यार्थ्यांची ये- जा सुरू होती. दोनशेवर महाविद्यावयीन विद्यार्थ्यांकडून बस सुरू करण्याची मागणी वारंवार होती. ग्रामस्थांतून पाठपुरावा सुरू होता. याप्रश्नी येथील काही महिलांनी पुढाकार घेतला. ग्रामविकास अधिकारी किसन रोंगटे यांनी निवेदन तयार केले. महिला बचत गटाच्या समन्वयक सावित्री गिरी व रूपाली मोरे यांनी आगार व्यवस्थापक विजय मोरे यांना निवेदन दिले. त्यांनी सकारात्मता दर्शवली. 

शाहूपुरीच्या अंगणी मार्चअखेर पाणी; वाढीव निधीमुळे योजनेच्या कामाला गती 

त्यानुसार सकाळी सातच्या सुमारास काल पहिल्या फेरीचे आगमन झाले. लालपरीचे ग्रामस्थांनी उत्साहात स्वागत केले. गाडीची सजावट केली. त्यानंतर महिलांनी पूजन केले. सरपंच शुभांगी खबाले, उपसरपंच सचिन पाचुपते यांनी उद्‌घाटन केले. ग्रामपंचायत सदस्य बाबूराव खबाले, सदस्य संतोष कासार- पाटील, हर्षल राऊत, शिवाजी पाटील, विजय कणसे, रघुनाथ खबाले यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. चालक प्रकाश साळुंखे व वाहक प्रवीण पाटील यांचा सत्कार झाला. आगार प्रमुखांशी चर्चा करून बसफेऱ्या निश्‍चित केल्या जातील, अशी माहिती उपसरपंच श्री. पाचुपते यांनी दिली. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे