जिवाच्या आकांताने धडपडणाऱ्या पारव्याला चिमुकल्यांनी दिले जीवदान

Satara Latest Marathi News, Satara News
Satara Latest Marathi News, Satara News
Updated on

उंडाळे (जि. सातारा) : येथील स्वातंत्र्यवीर दादासाहेब उंडाळकर विद्यालयातील हरित सेनेच्या विद्यार्थ्यांनी तारेच्या कुंपणात अडकलेल्या पारव्याला त्यातून सोडवून सुरक्षित ठिकाणी सोडून जीवदान दिले. 

स्वातंत्र्यवीर दादासाहेब उंडाळकर विद्यालयाच्या पाठीमागील बाजूला पोलिस ग्राउंड आहे. पोलिस ग्राउंडमध्ये असणाऱ्या आडातील पाणी व्यवस्थित राहावे. त्यामध्ये झाडाची पाने पडू नयेत. यासाठी जाळी मारण्यात आलेली आहे; पण जाळीच्या दोऱ्यात पारव्याचा पाय अडकला. जाळीत पाय अडकल्याचे लक्षात आल्यावर परवा जीवाच्या आकांताने ओरडत त्यातून सुटण्याचा प्रयत्न करत होता.

ही बाब सोहम पाटील, हर्षद चव्हाण यांनी हरित सेनेचे समन्वयक जगन्नाथ माळी, तसेच महेंद्र आंबवडे यांना सांगितली. त्यानंतर जिवाच्या आकांताने धडपडणाऱ्या पारव्याला सुस्थितीमध्ये त्यातून बाहेर काढण्यात आले. त्याला पाणी व धान्य खायला देऊन तो व्यवस्थित असल्याची खात्री झाल्यानंतर त्याला हरित सेनेचे समन्वयक माळी व विद्यार्थ्यांनी सुरक्षित ठिकाणी सोडून दिले. 

साताऱ्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Pune Satara Highway weekend traffic
Greater Flamingo sighting
Koyna Dam reservoir live storage report July 2026
Koyana Dam Water Release
Marathi News Esakal
www.esakal.com