esakal | सोळशीत दगडाचा धाक दाखवून दांपत्यास लुटले; दागिन्यांसह अडीच लाखांचा ऐवज लंपास

बोलून बातमी शोधा

Satara Latest Marathi News}

दोघांनी हातात दगड घेऊन फिर्यादी महिलेस व तिच्या पतीस दमदाटी करून अंगावरील सोन्याची मागणी केली.

satara
सोळशीत दगडाचा धाक दाखवून दांपत्यास लुटले; दागिन्यांसह अडीच लाखांचा ऐवज लंपास
sakal_logo
By
अतुल वाघ

वाठार स्टेशन (जि. सातारा) : सोळशी येथील केदारेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर धनकवडी (पुणे) येथील फिरायला आलेल्या नवरा, बायकोला तीन अज्ञात चोरट्यांनी दगडाचा धाक दाखवून सोन्याचे दागिने व रोकड लुटल्याची घटना घडली. 

वाठार पोलिस ठाण्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, योगिराज विजय माने व त्यांची पत्नी पल्लवी माने (रा. धनकवडी, पुणे) येथून देवदर्शनासाठी सोळशी येथील शनी मंदिरात आले होते. शनी मंदिराचे दर्शन घेऊन ते दोघे केदारेश्वर मंदिराकडे जाताना केदारेश्वर मंदिराचे अंतर जास्त असल्यामुळे अर्ध्या रस्त्यातूनच माघारी परत येत असताना दुपारी बाराच्या सुमारास तीन अनोळखी व्यक्ती आल्या. तीनपैकी एक दुचाकीवर उभा होता. 

साताऱ्यात व्यापाऱ्यांच्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद; केंद्र सरकारविरुध्द घोषणाबाजी

बाकीच्या दोघांनी हातात दगड घेऊन फिर्यादी महिलेस व तिच्या पतीस दमदाटी करून अंगावरील सोन्याची मागणी केली. ज्या ठिकाणी घटना घडली. त्या ठिकाणी निर्जन ठिकाण असल्यामुळे भीतीपोटी फिर्यादीने अंगावरील सोन्याचे दागिने व पाच हजार रुपयांची रोकड दिली. सोन्याचे दागिने, मोबाईल व रोकड असे मिळून 2 लाख 51 हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी घेऊन तिथून पोबारा केला. याबाबतची फिर्याद पल्लवी माने (रा. धनकवडी, पुणे) यांनी वाठार पोलिस ठाण्यात दिली असून, पुढील तपास वाठार पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक स्वप्नील घोंगडे करीत आहेत. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे