esakal | पुणेकरांनो! सातारा-कोल्हापूरला निघालाय, थांबा; खंबाटकी घाट झालाय जाम

बोलून बातमी शोधा

Satara Latest Marathi News Satara News

खंबाटकी घाटात अचानक वाहतूक कोंडी झाल्याने अनेकांची तारांबळ पहायला मिळाली. दरम्यान, साडेदहा वाजता कोंडी झालेली वाहतूक कॅनॉल मार्गे बोगद्याकडे वळवण्यात आली आहे.

पुणेकरांनो! सातारा-कोल्हापूरला निघालाय, थांबा; खंबाटकी घाट झालाय जाम
sakal_logo
By
अशपाक पटेल

खंडाळा : पुणे-सातारा महामार्गावरील खंबाटकी घाटात पाचव्या वळणावर सहा ते सात सीएनजी कार अचानक बंद पडल्याने घाट रस्ता सकाळी साडेनऊ वाजल्यापासून बंद पडला आहे. शनिवार व रविवार सलग सुट्ट्या असल्याने रस्त्यावर वाहनांची मोठी गर्दी असून यामुळे खंबाटकी घाटाच्या पायथ्यापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.

पुण्याहून-साताराकडे जात असताना घाटमाथ्यावर दत्तमंदिर व खामजाई मंदिर परिसरात चार पदरीचे काम रखडल्याने येथे सिंगल लेन सुरु होते. यामुळे येथे वाहने बंद पडून अनेक वेळा घाट जाम होत असतो, तसेच याही वेळी येथेच वाहने बंद पडल्याने वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. दरम्यान, घटनास्थळी तत्काळ खंडाळा पोलिस ठाण्याचे विठ्ठल पवार हे दाखल झाले असून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.

‘How’s The Josh’! सातारा जिल्ह्यातील शेतकरी कन्या सैन्य दलात; आसाम रायफलमध्ये निवड

खंबाटकी घाटात अचानक वाहतूक कोंडी झाल्याने अनेकांची तारांबळ पहायला मिळाली. दरम्यान, साडेदहा वाजता कोंडी झालेली वाहतूक कॅनॉल मार्गे बोगद्याकडे वळवण्यात आली, तर बोगद्यामार्गे वाहतूक सोडल्यानंतर सातारा ते पुण्याकडे येणाऱ्या वाहतुकीची प्रचंड कोंडी झाल्याचे चित्र होते. सकाळी साडेअकराच्या दरम्यान एक पोलिस व दोन होमगार्ड असल्याने पोलिसांचे वाहतुकीवरील नियंत्रण राहिले नसल्याने वाहतूक खोळंबली होती. तद्नंतर तब्बल दोन तासाने खंडाळ्याचे अधिक पोलिस घाटात रवाना झाले असून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरु आहे. सध्या घाटातील वाहतूक धिम्या गतीने सुरु आहे.

यशवंतरावांच्या आत्मचरित्रातील कृष्णा-कोयना अनुभवण्यासाठी सुप्रिया सुळे थेट प्रीतिसंगमावर

संपादन : बाळकृष्ण मधाळे