शेतकऱ्यांच्या पाठिंब्यासाठी कऱ्हाडात एल्गार; मोदी सरकारविरोधात शनिवारी आंदोलन

Satara Latest Marathi News Satara News
Satara Latest Marathi News Satara News
Updated on: 

कऱ्हाड (जि. सातारा) : कृषी कायदे रद्द करावे, या मागणीसाठी दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आणि कायदे रद्द व्हावे, या मागणीसाठी सर्व शेतकरी संघटना व सर्व पक्षांच्या वतीने शनिवारी (ता. 6) दुपारी 12 वाजता रास्ता रोको-चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन बळीराजा शेतकरी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी केले. 

शेतकरी आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी आयोजित आंदोलनाची माहिती देताना श्री. पाटील बोलत होते. ते म्हणाले, "शेतकरी विरोधी कायदे मागे घ्यावेत, म्हणून दिल्ली येथे देशातील लाखो शेतकरी दोन महिने थंडी-वाऱ्यात आंदोलन करत आहेत. त्यांच्यावर 26 जानेवारीला दिल्ली पोलिसांनी अमानुषपणे अत्याचार केला आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या ठिकाणी वीज व पाणीपुरवठा बंद करून त्यांना त्रास देण्यात येत आहे.

आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या शेतकऱ्यांवर पोलिसांमार्फत दबाव आणण्यात येत आहे. त्याचा निषेध म्हणून दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आणि शेतकरी विरोधी कायदे रद्द करावे, या मागणीसाठी सर्व शेतकरी संघटना व सर्व पक्षांच्या वतीने शनिवारी दुपारी बारा ते तीन या दरम्यान रास्ता रोको-चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांनीही सहभागी व्हावे.'' 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Sangli District Bank Election
Panchayat Samiti members discuss drought conditions and irrigation issues in Walwa taluka
Khambatki Ghat Traffic Jam on Pune-Satara Highway
Satara Munawale Water Tourism Centre Reopens With Adventure Sports And Modern Freshwater Tourism Facilities
Marathi News Esakal
www.esakal.com