धक्कादायक! व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांवर दमदाटी करत वांगी, दोडक्यासह शेतीमाल दिला रस्त्यावर फेकून

Satara Latest Marathi News
Satara Latest Marathi News

मलकापूर (जि. सातारा) : कोयना वसाहत येथे दोन शेतकऱ्यांचा माल व्यापाऱ्यांनी दमदाटी करत रस्त्यावर फेकून दिल्याची घटना घडली. तसेच रस्त्यावरील मंडईबाबत काही रहिवाशांनीही प्रशासनाला पत्र दिल्याने बुधवारी प्रशासनाने तत्काळ कारवाई करत मंडई हटवण्याचा निर्णय घेत अधिकृत मंडईतच बसावे, अशा सूचना दिल्या. 

दरम्यान तहसीलदार अमरदीप वाकडे, मुख्याधिकारी राहुल मर्ढेकर यांनी बुधवारी मलकापूर मंडईची पाहणी करून इतरत्र मनमानी करून बसणाऱ्यांवर कारवाईच्या सूचना दिल्या. अधिकृत भाजी मंडई असतानाही काही व्यापारी जुन्या जागीच ठाण मांडत मंडई भरवत आहेत. पालिकेने अनेक वर्षांचा भाजी मंडईचा प्रश्न मिटवत राजमाता अहल्यादेवी होळकर भाजी मंडई सुरू केली. मात्र, काही व्यापाऱ्यांनी प्रशासनाच्या सूचनांना पायदळी तुडवत कोयना वसाहत रस्त्यावर मंडई भरवली. मंडईत ग्रामीण भागातील शेतकरी शेतीमाल विक्रीसाठी येतात. मात्र, व्यापारी त्यांना बसायला जागा देत नाहीत. 

मंगळवारी काले येथील दोन शेतकरी दोडका घेऊन कोयना वसाहतीत विक्रीसाठी गेल्यावर दोन व्यापाऱ्यांनी दादागिरी करत त्यांना इथे बसायचे नाही, असे धमकावले. त्यांनी शेतकऱ्यांकडील दोडका, वांगी व इतर माल रस्त्यावर फेकून दिला. हा प्रकार स्थानिक ग्रामस्थांसह रहिवाशांनी पाहिला. याप्रकरणी सायंकाळी संबधित शेतकरी यांनी याबद्दल कऱ्हाड पोलिसात तक्रार देण्यासाठी धाव घेतली होती. दरम्यान बुधवारी कोयना वसाहत प्रशासनाने रस्त्यावर वाहतुकीला अडथळा होणाऱ्या विक्रेत्यांना हटवायला दुपारी सुरवात केली. पोलिसांनीही वाहतुकीला अडथळा होईल, अशा पद्धतीने बसलेल्या विक्रेत्यांना तत्काळ हटवण्याची कार्यवाही सुरू केली.

संपादन : बाळकृष्ण मधाळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com