esakal | कऱ्हाडात फॅन्सी नंबर प्लेटसह 'धूम स्टाइल' सुसाट; पोलिसांची तब्बल 27 हजार युवकांवर कारवाई

बोलून बातमी शोधा

Satara Latest Marathi News

वाहतूक पोलिसांच्या कारवाईत युवकांना "टार्गेट" केले आहे. युवकांवर "वॉच' ठेऊन पोलिसांनी बेधडक दंडात्मक कारवाईवर भर दिला आहे.

कऱ्हाडात फॅन्सी नंबर प्लेटसह 'धूम स्टाइल' सुसाट; पोलिसांची तब्बल 27 हजार युवकांवर कारवाई

sakal_logo
By
सचिन शिंदे

कऱ्हाड (जि. सातारा) : फॅन्सी नंबर प्लेट लावून 'धूम स्टाइल'ने वाहन मारणे, सुसाट वाहन चालविण्यासह बिनधास्त ट्रिपलशीट फिरणाऱ्या तरुणाईवर वाहतूक कारवाईचा बडगा उगारला आहे. सात वर्षांत 27 हजार 500 युवकांवर कारवाई केली आहे. त्यांच्याकडून तब्बल 45 लाख 27 हजार 340 रुपयांचा दंडही वसूल केला आहे. यापुढेही कारवाई अशीच सुरू ठेवली जाणार आहे. त्यामुळे दुचाकी फिरवणाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार कायम राहणार आहे. 

वाहतूक पोलिसांच्या कारवाईत युवकांना "टार्गेट" केले आहे. युवकांवर "वॉच' ठेऊन पोलिसांनी बेधडक दंडात्मक कारवाईवर भर दिला आहे. पोलिसांनी सात वर्षांत 27 हजार 500 युवकांवर कारवाई केली आहे. 2016 मध्ये चार हजार 590, त्यापाठोपाठ 2019 मध्ये पाच हजार 618 तर 2020 मध्ये सर्वाधिक पाच हजार 892 युवकांवर कारवाई झाली आहे. फॅन्सी नंबर प्लेट, खराब नंबर प्लेट, विना परवाना वाहन चालवणे, तीबलशीट अशा पद्धतीच्या दुचाकीवरून फिरणाऱे युवक पोलिसांनी "टार्गेट' केले आहेत. 

Weekend Lockdown Effect : किराणा, औषध दुकानदारांसह किरकाेळ व्यावसायिक बनले लुटारु; सातारकरांची फौजदारीची मागणी 

वाहतूक शाखेत सहायक पोलिस निरीक्षकांसह 42 कर्मचारी आहेत. वाहतूक शाखेकडून वाहतूक कोंडी हटवणे, अपघात झाल्यानंतर स्पॉटवर जाण्यासह शहरातील कोंडी हटविण्यासाठी विविध उपाययोजना राबविल्या जातात. त्यासोबत वाहनांवरील कारवाई अधिक प्रभावी राबवली जात आहे. वाहतूक शाखेच्या पोलिसांनी प्रबोधनही करूनही फरक सुसाट वाहन मारणाऱ्यांवर फरक पडत नसल्याने कारवाईचा दंडुका उचलावा लागतो आहे. युवकांनी वाहन चालवताना सावधगिरी कशी ठेवावी याबाबत पोलिसांनी नेहमीच मार्गदर्शन केले. मात्र, त्याचा फरसा फरक पडत नसल्याने कारवाईचाही सपाटा लावला. 

रामायणातील राम सेतूबद्दल या 6 गोष्टी माहिती आहेत?; जाणून घ्या 7 हजार वर्षांपूर्वीची इतिहासाची रंजक कहाणी 

दंडात्मक कारवाई... 

वर्ष गुन्ह्याची संख्या दंडाची संख्या
2014 2373 दोन लाख 79 हजार 900
2015 3006 तीन लाख 10 हजार 
2016 4590 पाच लाख 27 हजार 300 
2017 1986 तीन लाख 97 हजार 600
2018 3961 सात लाख 78 हजार 600
2019 5618 10 लाख 55 हजार 540
2020 5892 11 लाख 78 हजार 400 

साताऱ्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

संपादन : बाळकृष्ण मधाळे