धक्कादायक! पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात साताऱ्यात दोघांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 23 January 2021

डबेवाडी आणि जकातवाडीच्या बाजूलाच सातारा शहराचा कचरा डेपो असल्याने येथे मोठ्या संख्येने मोकाट कुत्र्यांचा वावर आहे.

सातारा : येथील सदर बझार परिसरात सात ते आठ मोकाट कुत्र्यांच्या कळपाने एका लहान मुलीवर हल्ला केल्याची घटना ताजी असतानाच आता पिसाळलेल्या  कुत्र्यांनी आपला मोर्चा डबेवाडी आणि जकातवाडीच्या दिशेने वळवला आहे. दरम्यान, गावात पिसाळलेल्या कुत्र्यांनी थैमान माजवायला सुरुवात केली असून या कुत्र्यांच्या हल्ल्यात रुपाली माने व देवानंद लोंढे या तरुणांचा उपचार सुरु असताना अंत झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

डबेवाडी आणि जकातवाडीच्या बाजूलाच सातारा शहराचा कचरा डेपो असल्याने येथे मोठ्या संख्येने मोकाट कुत्र्यांचा वावर आहे. रस्त्यावर व चौकाचौकांत ठिकठिकाणी कुत्र्यांच्या झुंडी दिसत आहेत.अनेक वेळा लहान मुलांवर हल्ले झाल्याच्या घटना घडल्या आहेत. काही वर्षांपूर्वी गावांत शाळेसमोर मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात एका मुलीचा मृत्यू झाला होता; तर आता परत डबेवाडी आणि जकातवाडी येथे पिसाळलेल्या कुत्र्याने अनेकांवर हल्ला केला आहे.

वसुंधरा पुरस्कार संशयाच्या भोवऱ्यात; पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल असताना गौरव होतोच कसा?

कुत्र्यांनी मुलीचे भरदिवसा शरीराचे लचके तोडल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशाच प्रकारचे हल्ले गावांत होऊ लागल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणात प्रशासनाने वेळेच लक्ष घालून मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांतून होऊ लागली आहे.

खेड ग्रामपंचायतीत दिव्यांग निधीत मोठा भ्रष्टाचार; माहिती अधिकारात माहिती उघड

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara News Two People Death In Dog Attack In Satara