आरक्षण काेणाला द्यावे अन् काेणाला नकाे; उदयनराजेंची भूमिका

Udayanraje Bhosale
Udayanraje Bhosaleesakal

सातारा : मराठा आरक्षणावरुन (maratha reservation) राज्यात पुन्हा एकदा रान तापले आहे. आज (रविवार) शिवराज्यभिषेक दिना (ShivRajyabhishek) निमित्त खासदार उदयनराजेंनी (udayanraje bhosale) जलमंदिर पॅलेस येथे छत्रपती शिवाजी महाराज (ChhatrapatiShivajiMaharaj) यांना अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना राज्य सरकरावर टीकेची झाेड उठवली. याबराेबरच लवकरात लवकर श्वेतपत्रिका जाहीर झाली पाहिजे अशी मागणीही उदयनराजेंनी केली. सर्व जाती धर्मातील आर्थिक कमकुवत असलेल्यांना लाेकांना आरक्षण लागू करा अशी टिप्पणी उदयनराजेंनी केली. (maharashtra-news-udayanraje-bhosale-addressed-media-maratha-reservation-shivrajyabhishek-satara)

मराठा आरक्षणाच्या मुद्यांवर संभाजीराजे (YuvrajSambhaji) सर्वांची भेट घेत आहेत. परंतु तुमची भेट त्यांनी घेतलेली नाही. तुमच्यात आणि त्यांच्या वैचारिक मतभेद आहेत का या प्रश्नावर उदयनराजे (udayanraje bhosale)म्हणाले ते माझे धाकटे भाऊ आहेत. काेणतेही वैचारिक मतभेद नाहीत. त्यांच्याबराेबरच सर्वांवर म्हणजेच रयतेवर माझे प्रेम आहे. भेदभाव असण्याचे काही कारणच नाही.

संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा आरक्षणप्रकरणी दिलेला अल्टिमेटम संपला असून त्यांनी रायगडावरुन आपली भूमिका स्पष्ट केली आहे. संभाजीराजेंकडून आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. 16 जूनपासून मराठा समाजाचा पहिला मोर्चा काढण्यात येईल संभाजीराजेंनी स्पष्ट केले आहे. त्यावर उदयनराजे म्हणाले दुर्देवी गाेष्ट आहे आंदाेलन करण्याची वेळ येत आहे. काेणत्याही परिस्थितीत सर्वांना एकत्र घेऊन राज्य कारभार चालला पाहिजे असे मी नेहमी सांगत असताे. मग सत्ता काेणाचीही असाे. काेणाचेही आरक्षण काढून अन्य काेणाला देऊ नका. मराठा समाजावर भेदभाव करु नका. त्यांचा देखील अधिकार आहे त्यावर. गायकवाड आयाेगाने सविस्तर दिलं असताना ते का टाळलं जात आहे. त्याचे व्यवस्थित वाचन झाल नाही. झाल असतं तर सर्वाेच्च न्यायालयाच्या बेंचने नकारात्मक निकाल दिला नसता.

Udayanraje Bhosale
16 जूनपासून मराठा समाजाचा पहिला मोर्चा- संभाजीराजे

तुम्हांला जर क्रेडिट घ्यायचे असेल तर चांगल्या कामाचे घ्या असा टाेला उदयनराजेंनी राज्य सरकारला लगावला. दाेन दिवसांपुर्वी भाेसले आयाेगाचा अहवाल सरकारकडे पाठविण्यात आला आहे. त्यावर काय भुमिका घेते बघू असेही उदयनराजेंनी नमूद केले. एखादा अहवाल स्विकारल्यानंतर ताे पुन्हा न्यायालयात पाठविण्याची आवश्यकता नव्हती. मराठा समाज हा आर्थिक दृष्ट्या मागस म्हणून साेय प्रमाणे अर्थ काढणार असेल तर याेग्य नाही असेही उदयनराजेंनी स्पष्ट केले. ईडब्यूलएस हे केंद्र शासनाने लागू केले आहे.

जाती धर्मांत तेढ निर्माण करण्याचे काम काेणी करु नका. जे तुम्ही करीत आहात त्याची श्वेतपत्रिका काढा. आता काेणीही राजकारण करु नका. लाेकांना न्याय हवाय. न्याय देण्याच्या काम छत्रपती शिवाजी महाराज यांनी केली तसं त्यांचे विचार आचारणात आणा. तुमच्या अंतकरणात शिवाजी महाराज असतील तर त्यांचे विचार आचारणात आणण्याचे काम तरी करा हीच शिवरायांना भेट दिल्याचे ठरेल.

Udayanraje Bhosale
Udayanraje Live : ..तर देशाचे तुकडे हाेण्यास वेळ लागणार नाही
Maratha-Reservation
Maratha-ReservationE-sakal

माध्यांम समाेर आल्यावर एक बाेलायचे आणि करायचे दूसरं हे याेग्य नाही. समाजाचे डाेळे तुमच्याकडे लागून राहिले आहेत. तुम्ही कसं वागता आणि काय करता. यामध्ये काेणाचीही सुटका नाही. जर उद्रेक झाला तर केवळ राज्यकर्ते जबाबदार असतील. कारण नसताना टाेलावा टाेलवी करुन पक्ष काेणताही असाे. दूध का दूध आणि पाणी का पाणी झालंच पाहिजे. अधिवेशन बाेलवा अशी मागणीही उदयनराजेंनी केली. लाेकांना कळू द्या आपण निवडून दिलेले लाेकप्रतिनिधी काय काम करीत आहेत.

Udayanraje Bhosale
अल्टिमेटम संपला, रायगडावरुन संभाजीराजेंनी दिली आंदोलनाची हाक

मराठा आरक्षणाचे नेतृत्व तुम्ही करणार का ?

मी काेण ठरविणार. आता लाेकच ठरविणार आहेत. एक सांगताे तुम्ही लाेकांना व्यवस्थित ठेवण्याचे काम केले नाही तर वेगवेगळ्या जाती तेढ निर्माण झाल्यास उद्रेक हाेईल. दिशाभूल करण्याचे काम करु नका. ज्या दिवशी लाेकांना कळेल त्यावेळी ती तुम्हांला साेडणार नाहीत. ज्या पद्धतीने मांडणी करण्यात आली तीच चुकीचे करण्यात आल्याचे उदयनराजेंनी राज्य सरकारवर अप्रत्यक्ष टीका केली. त्यांनी स्पष्टीकरण देऊत मग मी भुमिका मांडताे. कधी करणार ते सगळे गेल्यानंतर का. मी काेणत्याही जाती धर्माच्या विराेधात नाही. भेदभाव करीत नाही. जात मानत नाही. लवकरात लवकर श्वेतपत्रिका जाहीर झाली पाहिजे अशी मागणी उदयनराजेंनी केली.

Maratha Reservation
Maratha Reservationesakal
Udayanraje Bhosale
Maratha Reservation लढाईत आम्हाला साथ द्यावी; हर्षवर्धन पाटील उदयनराजेंच्या भेटीला

युवा वर्ग हतबल

आज समाजातील युवक आत्महत्या करीत आहेत. हे वाईट आहे. काही दिवसांपुर्वी मी एका युवकाच्या वडिलांशी बाेललाे ते म्हणाले मी मूलास शिक्षण दिले, माेठे हाेण्यासाठी सगळं केले पण काय घडले आज माझ्या हातातून त्याला अग्नी द्यावा लागला. हे किती दुखद आहे तुम्हीच बघा असेही उदयनराजेंनी नमूद केले.

असं सर्वांनाच द्या

मराठा समाजात अनेक मंत्री आहेत खासदार आहेत. त्यांना कशाला हवे आरक्षण असेही बाेलले जाते यावर उदयनराजे म्हणाले किती लाेक असतील असे पाच टक्के. जे लाेक सधन आहेत त्यांना नका करा लागू असे माझे तर म्हणणे आहे. सर्व जाती धर्मात आर्थिक सक्षम असलेल्या लाेकांना नका लागू करु. जे कराेडपती, लखपती आहेत त्यांना नकाच देऊ पण जे भांगलायला जातात, गवंडी काम करायला जातात, जे राबराब राबतात त्यांना तरी द्या. त्या त्या जातीमधील आर्थित कमकुवत असलेल्यांना लाेकांना लागू करा अशी टिप्पणी उदयनराजेंनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com