Satara News : शेतकऱ्याला सरकारकडे भिक मागावी लागते हे दुर्दैवच - महादेव जानकर

नेते यशवंतराव चव्हाण यांच्या समाधिस्थळी अभिवादन करुन त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
mahadev jankar
mahadev jankar sakal
Updated on

कऱ्हाड - एका दाण्याचे हजार दाणे करण्याची ताकत असणाऱ्या शेतकऱ्याला राज्यकर्त्याकडे भिक मागावी लागते ही दुर्दैवाची बाब आहे. ही सिस्टीम बदलली पाहिजे. राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांची दिवाळी गोड होण्यासाठी शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी माजी मंत्री महादेव जानकर यांनी आज येथे केली.

बळीराजा शेतकरी संघटनेने ऊस व दूध दराबाबत सरकारचे लक्ष वेधण्यासाठी रॅली काढण्यात आली. त्यासाठी जानकर येथे आले होते. जेष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या समाधिस्थळी अभिवादन करुन त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, यशवंतराव चव्हाण यांनी सर्वसामान्य माणसांना राजकारणाची दारे खुली केली.

mahadev jankar
Satara News : शेतकऱ्यांच्या कष्टावर पावसाचे पाणी; कऱ्हाडला सोयाबीन, हायब्रीड, भात पीक भिजले ,ऊसतोड मजुरांनाही फटका

सत्तेचे विकेंद्रीकरण करण्याचे काम केले. शेतकरी हिताचे निर्णय घेतले. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राला वीज पुरविण्याचे काम सातारा जिल्हा करत आहे. शेतकऱ्याला वीज, रस्ता देण्याचे काम त्यांनी केले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी या वर्षी शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी. सध्या शेतकरी संघटनेचे आंदोलन सुरू आहे. त्यांच्या मागणीनुसार उसाला पाच हजार दर द्यावा, दुधाला शंभर रुपये दर मिळावा, शेतकऱ्याला टोल माफी करावी, अपेक्षा आहे. एका दाण्याचे हजार दाणे करण्याची ताकत शेतकऱ्यांत असून, जगाचा पोशिंद्याला आज राजकारण्यापुढे भीक मागावी लागत आहे, हे दुर्देवच आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

MLA Uttamrao Jankar :
Mahadev Temple Kagal nanibai chikhali
Political Ideology: RSP Chief Mahadev Jankar Reaffirms Commitment to Shahu-Phule-Ambedkar Legacy
Simplicity and Memories: Mahadev Jankar Shares Emotional Moments with Shepherds
Marathi News Esakal
www.esakal.com