दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला 'वंचित'चा पाठिंबा; केंद्र सरकारविरोधात साताऱ्यात धरणे

प्रशांत घाडगे
Thursday, 17 December 2020

कृषी कायद्याविरोधात दिल्ली येथे सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शवित केंद्र सरकारविरोधात आज 'वंचित'ने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर धरणे धरली.

सातारा : कृषी कायद्याविरोधात दिल्ली येथे सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शवित केंद्र सरकारविरोधात आज वंचित बहुजन आघाडीने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर धरणे धरली.
 
यावेळी जिल्हाध्यक्ष चंद्रकांत खंडाईत, श्रीरंग वाघमारे, शशिकांत खरात, बाळकृष्ण देसाई, गणेश कारंडे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते. केंद्र सरकारने शेतकरी संघटनांशी चर्चा न करता कृषीविषयक कायदे मंजूर केले आहेत. या कायद्यांमुळे शेतकरी देशोधडीला लागणार असून आर्थिक स्थिती डबघाईला येणार आहे. केंद्र सरकारने कृषी कायदा करुन खासगीकरणाचा घाट घातल्याचे दिसून येत आहे. या विरोधात दिल्लीच्या सीमेवर शेतकरी रस्त्यावर उतरुनही सरकारने दुर्लक्ष केले आहे. या उलट आंदोलक शेतकऱ्यांवर लाठीमार करण्यात आला आहे. त्यामुळे केंद्र सरकारविरोधात धरणे धरल्याचे वंचित बहुजन आघाडीने पत्रकाद्वारे सांगितले.

कऱ्हाडातील कार्वे, काले, उंडाळे, उंब्रजसह निम्मी गावे निवडणुकीत; तालुक्‍यात जोरदार रस्सीखेच 

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara News Vanchit Bahujan Aghadi Agitation Against The Central Government At Satara